scorecardresearch

‘धाकड’च्या अपयशानंतर कंगना रणौतने शेअर केली पोस्ट, ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाबाबत म्हणाली…

कंगना रणौतच्या ‘धाकड’ चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. पण तिने पण ‘धाकड’बरोबरच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Kangana Ranaut, Bhool Bhulaiyaa 2,
कंगना रणौतच्या 'धाकड' चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. पण तिने पण 'धाकड'बरोबरच प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैय्या २' चित्रपटाबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

कंगना रणौतचा ‘धाकड’ चित्रपट दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. कंगनाने या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. पण प्रत्यक्षात हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी रुपयांचा पल्ला देखील गाठला नाही. या चित्रपटाच्या बाबतीत कंगनाच्या पदरी अपयश आलं. पण ‘धाकड’ बरोबर प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैय्या २’ चित्रपट मात्र बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याचबाबत कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

“हिंदी बॉक्सऑफिसवर दमदार कमाई करत असलेल्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाचे आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन.” अशाप्रकारची पोस्ट कंगनाने शेअर केली आहे. कंगनाने चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे. तसेच आपला चित्रपट फ्लॉप ठरून देखील दुसऱ्या चित्रपटाचं कौतुक करणं यामागे कंगनाचं मन अगदी मोठं आहे असंच म्हणावं लागेल. आपला चित्रपट दुसऱ्या हिंदी चित्रपटासमोर फ्लॉप ठरला म्हणून निराश न होता कंगनाने नव्याने कामाला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – Photos : वयाची ४०शी उलटली अन् लंडनमध्ये सुप्रसिद्ध गायिकेनं थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो आले समोर

कार्तिकच्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. बॉक्सऑफिसवर सध्या त्याच्याच चित्रपटाचा बोलबाला आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये देखील कार्तिक आणि कियारा अडवाणीचा हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होत आहे. कार्तिक सध्या चित्रपटाला मिळत असलेलं यश एण्जॉय करत आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री कंगना रणौतला झटका, कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

कार्तिकच्या इतर चित्रपटांच्या तुलनेमध्ये या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. कार्तिकच्या ‘लव आज कल’ चित्रपटाने १२.४० कोटी, ‘पति पत्नी और’ चित्रपटाने ९.१० कोटी, ‘लुका छुपी’ चित्रपटाने ८.०१ कोटी तर ‘प्यार का पंचनामा 2’ चित्रपटाने ६.८० कोटी रुपये पहिल्याच दिवशी कमावले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kangana ranaut congratulates kartik aaryan and kiara advani bhool bhulaiyaa 2 for ending bollywood dry spell kmd

ताज्या बातम्या