सध्या देशभरात करोनाचा कहर पाहयला मिळतोय. करोनाचं संकट आणि लॉकडाउनमुळे अनेकांची रोजगार गेले आहेत. तर अनेकांकडे खाण्या पिण्यासाठी आणि उपचारासाठी पुरेसे पैसे नाहित. अशा अनेक गरजूंची मदत करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत. विविध माध्यमातून हे सेलिब्रिटी गरजूंची मदत करत आहेत. तर काही सेलिब्रिटी फंड रेजरच्या मदतीने इतर नागरिकांना मदतीचं आवाहन करून निधी गोळा करत आहेत आणि गरजूंना तसंच वैद्यकीय सेवेसाठी हातभार लावत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र सेलिब्रिटींचं हे फंड रेजरच्या मदतीने निधी गोळा करणं बॉलिवूडच्या क्वीनला आवडलेलं दिसतं नाही. कारण इन्स्टाग्रामवरून आता कंगनाने या सेलिब्रिटींवर टीका केलीय. या पोस्टमध्ये कंगनाने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. ती म्हणालीय, “कदाचित काही लोकांसाठी कठीण असेल पण लोकांना ही गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे महामारीतून मिळालेली शिकवण.” असं म्हणत कंगनाने ५ मुद्दे मांडले आहेत.

काय आहेत कंगानते मुद्दे
1. “कुणीही लहान मोठं नाही. प्रत्येकजण मदत करू शकतं. मात्र त्यासाठी आपली भूमिका, जागा आणि समाजातील प्रभाव ओळखा.”
2.”जर तुम्ही श्रीमंत आहात तर गरीबांकडे भीक मागू नका.”
3. “जर तुमच्या प्रभावामुळे ऑक्सिजन, बेड आणि औषधांची सोय होऊ शकते तर तुम्ही काही लोकांचा जीव वाचवू शकता.”
4. “जर तुम्ही नावाजलेल्या व्यक्ती आहात तर इतरांच्या मागे धावण्यापेक्षा अशांना सपोर्ट करा आणि त्याचं रक्षण करा जे लाखो लोकांचा जीव वाचवू शकतात.”
5. “जर ती शक्ती आठवडाभरात अरबो लोकांच्या ऑक्सीजन आणि बेडची समस्या सोडवू शकत असेल तर त्यात आपलं योगदान नक्की जाहीर करा.प्रत्येकाला तुमच्या दयाळू स्वभावाबद्दल कदाचित कळणार नाही कारण आयुष्यात अनेक जण फक्त ड्राम करतात आणि काहीजण काळजी करतात. लव्ह कंगना”

(photo-instastory@kanganaranaut)

अनेक सेलिब्रिटी भारतासाठी फंड गोळा करत असताना कंगनाने ही पोस्ट केल्याने कंगाने या सेलिब्रिटींवर निशाणा साधल्याचं म्हंटलं जातंय. नुकतच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा तसचं अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने सोशल मीडियावरून आवाहन करत मोठी निधी गोळा केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut dig at celebs who are raising fund for covid said do not beg from poor kpw
First published on: 19-05-2021 at 20:10 IST