कंगना रणौतचा पुन्हा प्रेमभंग? सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, “तेरे लिए…”

सध्या तिची ही पोस्ट प्रचंड चर्चेत पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. ती अनेकदा एखाद्या मुद्द्यावर वक्तव्य करत तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा तिच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाने मी लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर कंगनाच्या जोडीदाराबद्दल अनेक तर्क-विर्तक लढवले जात होते. मात्र आता कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तिचा हार्टब्रेक झाल्याचे बोललं जात आहे.

कंगनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एका गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. “तेरे लिए हम हैं जिये…कितने सितम हम पे सनम।” असे तिने लिहिले आहे. त्यासोबतच कंगनाने एका जोडप्याच्या स्केचचा फोटो पोस्ट केला आहे. सध्या तिची ही पोस्ट प्रचंड चर्चेत पाहायला मिळत आहे.

दरम्यान तिची ही पोस्ट पाहून अनेकजण तिचा प्रेमभंग झाल्याचे बोलत आहेत. मात्र कंगनाने अद्याप याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. कंगना याआधी आदित्य पांचोली, अध्यायन सुमन आणि हृतिक रोशनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे.

हेही वाचा : बंदी घालणाऱ्या ट्विटरच्या सीईओ पदावरुन जॅक डॉर्सी पायउतार झाल्यानंतर कंगनाने दिला निरोप; म्हणाली.. “Bye…”

दरम्यान, कंगना लवकरच ‘धाकड’, ‘तेजस’ आणि ‘इमर्जन्सी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या शिवाय कंगना ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा’ आणि ‘सीता- द इन्कारनेशन’मध्येही काम करणार आहे. यासोबतच कंगना ‘टिकू वेड्स शेरू’ या आणखी एका चित्रपटाची निर्मिती करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut drops a cryptic post hinting at a heartbreak goes viral nrp

ताज्या बातम्या