अभिनेत्री कंगना रणौत ही कायम आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असते. अनेकदा तिची वक्तव्यं वादग्रस्तही ठरतात. कंगना कायम घराणेशाही, बॉलीवूडमध्ये येण्यासाठी नव्या आणि बाहेरच्या व्यक्तीला करावा लागणारा स्ट्रगल यावरही ती सतत भाष्य करत असते. याबद्दल तिने नुकतीच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेटही घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. काल तिने जावडेकर यांची भेट घेतली. तिने या भेटीचे फोटो कॅप्शनसह शेअर केले आहेत. यात ती म्हणते, “आज शूटिंगनंतर आदरणीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. विशेषतः महिलांना आणि बॉलीवूडमध्ये पूर्णतः नवीन लोकांना सहन करावा लागणारा भेदभाव याबद्दल बोलणं झालं. तुमच्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद.”

कंगनाने दिल्लीमध्ये जावडेकर यांची भेट घेतली. तिथे ती तिच्या ‘तेजस’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात ती हवाई दलाच्या पायलटची भूमिका साकारणार आहे. ‘तेजस’ हा चित्रपट भारताच्या सैन्य दलाला दिलेली मानवंदना असणार आहे, असंही तिचं म्हणणं आहे.

‘तेजस’च्या आधी यावर्षी कंगनाचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘थलायवी’ या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या बायोपिकमध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत प्रकाश राज, अरविंद स्वामी, जिशू सेनगुप्ता, मधू हे कलाकारही दिसणार आहेत. येत्या 23 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्यासोबतचा तिचा ‘धाकड’ हा चित्रपट १ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut meets information and broadcast minister prakash javdekar in delhi vsk
First published on: 11-03-2021 at 12:17 IST