आज ६ जुलै, जगभरात आजचा दिवस इंटरनॅशनल किसींग डे म्हणून साजरा करण्यात येतो. जर किस बाबत म्हणायचं झालं तर हॉलिवूडपेक्षाही पुढे बॉलिवूड आहे. अशाच अनेक चित्रपटांतील आणि कलाकारांच्या किसींग सीन्सची आठवण आजच्या इंटरनॅशनल किसींग डे निमित्तानं काढली जाते. असाच एक किस्सा बॉलिवूडची ‘कॉन्ट्रोवर्शल क्वीन’ कंगना रणौतने शेअर केला होता. एका मुलाखतीत कंगनाने किसींग बद्दल शेअर केलेला हा किस्सा तुम्हाला सुद्धा किळस वाटू लागेल.
कंगना रणौतचा किसींग संबंधित हा किस्सा ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. या शूटिंग दरम्यान तिला अशाच काहीश्या प्रसंगाला समोरं जावं लागलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान थंड वातावरणामुळे अभिनेता शाहिद कपूरला सर्दी झाली होती. त्याचवेळी अभिनेत्री कंगना रणौतला शाहिद कपूरसोबत किसींग सीन शूट करावा लागला होता. तिच्या या किसींग सीन बद्दल बोलताना एक किस्सा असा सांगितला जो ऐकून कोणतेच कपल याची कल्पना देखील करणार नाहीत.
यावेळी बोलताना कंगनाने सांगितलं, “खरं तर चित्रपटांमध्ये मला किसींग सीन्स आवडत नाहीत. या सीनला शूट करणं सगळ्यात अवघड काम आहे. समोरच्या व्यक्तीसोबत आपलं खूपच औपचारिक नातं असतं आणि अचानक त्या व्यक्तीला किस करावं लागतं…”
‘रंगून’ या चित्रपटात कंगनाचे अभिनेता शाहिद कपूरसोबत बरेच इंटीमेट सीन आहेत. शाहिदसोबत केलेल्या किसींग सीन बद्दल विचारल्यानंतर कंगना म्हणाली, “एक तर शाहिद कपूरच्या मोठ्या मिशा असंही भयंकर दिसत होत्या…त्या पाहून मला किसींग सीन करण्याची इच्छाच होत नव्हती…पण माझी ट्रॅजेडी फक्त इथवरंच नव्हती. ज्यावेळी या मिश्यांच्या बाबतीत मी शाहिद कपूरसोबत बोलले…तर त्याने सांगितलं की तो मिश्यांवर वॅक्स लावतो…सोबतच सर्दीने त्याचं नाक सुद्धा गळत होतं…इतकं सगळं असताना सुद्धा मी तो किसींग सीन केला होता.”
कंगना रणौतने ‘रंगून’ या चित्रपटात जुलिया नावाचं पात्र साकारलं होतं. यात ती एक एंटरटेनर, सिंगर, डान्सर असून एका बिनधास्त मुलीच्या भूमिकेत दिसून आली. ती एकाच वेळी दोन पुरूषांसोबत प्रेम करत असते. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूरसोबत सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत दिसून आला होता. या चित्रपटाची कहाणी १९४० च्या दशकातील दुसऱ्या महायुद्धातली दाखवण्यात आली होती.