बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायच चर्चेत असते. ती सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. तिची प्रत्येक पोस्ट ही चर्चेचा विषय ठरते. कंगना एक दिग्दर्शिका तसेच निर्माती देखील आहे. आता ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. तिच्या शोचे नाव आहे ‘लॉक अप.’ या शोमध्ये ती इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रिटींना लॉकअप ठेवणार आहे. कंगनाने आता बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरला लॉकअप जेलमध्ये टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कंगनाचा ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो चर्चेत आहे. नुकताच या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये ती करण जोहरला जवळचा मित्र असे बोलताना दिसत आहे आणि त्याला लॉक अप जेलमध्ये टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
PHOTOS: रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या दीप सिद्धूच्या प्रेयसीला पाहिलंत का?; कठीण काळात नेहमी होती सोबत
‘फिल्म इंडस्ट्रीमधील असे खूप लोक आहे ज्यांना लॉक अपमध्ये टाकू इच्छिते. माझ्या लॉक अपमध्ये माझी आवडती स्टार कास्ट असणार आहे… सर्वात आधी तर माझा जवळचा मित्र करण जोहर आणि नंतर एकता कपूर’ असे कंगना म्हणाली.
कंगानाचे बोलणे ऐकून एकता कपूरला हसू अनावर होते. ती म्हणाली, ‘मी आणि करण आत बसून खाण्याविषयी गप्पा मारु… त्यानंतर कंगनाला देखील आत बोलवू आणि तिघे मिळून काही तरी पदार्थ खाऊ.’
कंगनाच्या ‘लॉकअप’ या शोमध्ये ती टीव्ही क्वीन एकता कपूरसोबत दिसणार आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक हे ७२ दिवसांसाठी लॉकअपमध्ये बंद राहणार आहेत. हा शो २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या शो विषयी बोलताना कंगना म्हणाली होती की, ‘मी गेल्या काही दिवसांपासून ओटीटीसाठी काही करावे असा विचार करत होते. पण या शो विषयी नेमकं काय करावे हे मी काही ठरवले नव्हते. जेव्हा मला एकता कपूरचा फोन आला आणि तिने मला याबाबत माहिती दिली तेव्हा मला तो प्रचंड आवडला. त्यानंतर तो मी करण्याचा निर्णय घेतला.’