‘कांतारा’ या दाक्षिणात्य चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. इतर दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाची क्रेझही पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता व दिग्दर्शक रिषभ शेट्टीचंही कौतुक होताना दिसत आहे.

रिषभचा कांतारा चित्रपट पाहून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतही भारवून गेले होते. त्यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर रिषभने रजनीकांत यांची भेट घेतली. याचे फोटो रिषभने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोला त्याने “तुम्ही एकदा आमची प्रशंसा केली. आम्ही शंभर वेळा तुमची स्तुती करू”, असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमधील रिषभ रजनीकांतच्या पाया पडत असल्याच्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा >> आलिया भट्ट नोव्हेंबर महिन्यातील ‘या’ दिवशी देऊ शकते बाळाला जन्म, जाणून घ्या तारीख व वार

हेही वाचा >> Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा किसिंग सीन व्हायरल, ‘प्रेम प्रथा धुमशान’मधील बोल्ड अंदाज चर्चेत

एका चाहत्याने कमेंट करत “तू खूप भाग्यवान आहेस. थलायवा रजनीकांत यांना भेटण्याची तुला संधी मिळाली. तुझ्या पुढील प्रोजेक्टसाठी तुला शुभेच्छा”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “काय चित्रपट आहे. चित्रपटातील क्लायमेक्स पाहून मी अचंबित झालो”, असं म्हणत कांताराचं कौतुक केलं आहे. “तुमच्या आणखी चांगल्या चित्रपटांची वाट पाहत आहोत”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

हेही पाहा >> Photos : अमृता फडणवीसांच्या राज्यातील टॉप पाच राजकारण्यांच्या यादीत एकाही भाजपा नेत्याचं नाव नाही, म्हणाल्या “राज ठाकरे, सुप्रिया सुळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रजनीकांत यांनी कांतारा चित्रपट पाहिल्यानंतर रिषभ आणि चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं होतं. “ कांतारा चित्रपट पाहताना माझ्या अंगावर काटे आले. लेखक व दिग्दर्शक म्हणून तू उत्तम कामगिरी केली आहेस. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन”, असं ते म्हणाले होते. यावर रिप्लाय देत रिषभने “रजनीकांत सर चित्रपटसृष्टीतील तुम्ही मोठे स्टार आहात. मी तुमचा लहानपणापासून चाहता आहे. तुमच्या कौतुकामुळे माझं स्वप्न सत्यात उतरलं. तुमच्याकडून मला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे”, असं म्हटलं होतं.