“तुझे रिलेशनशिप पक्कं झालंय का?” कपिलच्या प्रश्नावर कार्तिक आर्यन म्हणतो…

नुकतंच याचा प्रोमो सोनी टिव्हीने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या धमाका चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अमृता सुभाषसह अनेक कलाकार पाहायला मिळत आहे. सध्या या चित्रपटाचे दमदार प्रमोशन सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘द कपिल शर्मा शो’ या शो मध्ये हजेरी लावली. यावेळी कपिल हा कार्तिक आर्यनला रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारतो. त्यावेळी कार्तिकने दिलेले उत्तर हे चर्चेचा विषय ठरत आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेला शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संपूर्ण टीम आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. या शो मध्ये नेहमीच विविध कलाकार हजेरी लावतात. येत्या भागात या शोमध्ये धमाका चित्रपटाची टीम हजेरी लावणार आहे. नुकतंच याचा प्रोमो सोनी टिव्हीने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत कपिल शर्मा हा कार्तिकची गंमत करताना दिसत आहे.

साऱ्या देशात ‘जय भीम’ची चर्चा; चित्रपट दाक्षिणात्य पण हिंदी व्हर्जनचाच बोलबाला

यावेळी कपिल शर्मा म्हणाला, “जेव्हा एखादा मुलगा रिलेशनशिपमध्ये नसतो तोपर्यंत तो फार रोमँटिक असतो. पण जेव्हा तो रिलेशनमध्ये येतो तेव्हा तो अचानक जीवनात थ्रील येतो. कार्तिकने आतापर्यंत इतके रोमँटिक चित्रपट केले आहेत पण आता धमाका चित्रपट घेऊन येत आहे. मग आम्ही काय समजावे तुझे रिलेशन पक्कं झालं आहे की तू ते लपवणं शिकला आहेस?” असे अनेक प्रश्न कपिलने यावेळी विचारले.

यावर कार्तिक आर्यन म्हणाला की “एका चित्रपटातील गाणं आहे, छुपाना भी नही आता, बताना भी नही आता,” हे गाणे गुणगुणतंच तो कपिलकडे हसत हसत बघतो. यानंतर परत कपिल हा कार्तिकला प्रश्न विचारतो, “तुला तुझ्या कोणत्याही सहकलाकारासोबत प्रेम होत नाही. तू फक्त प्रमोशनसाठी वाद निर्माण करतोस, हे खरं आहे का?” असे विचारल्यावरही तो पुन्हा तेच गाणे गुणगुणतो आणि जोरजोरात हसायला लागतो. दरम्यान कपिल शर्माच्या शो मधील हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

कार्तिक आर्यनच्या ‘धमका’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. यात कार्तिक एक न्यूज अँकरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मुंबईत झालेला बॉम्ब स्फोट आणि त्यानंतर कार्तिक आर्यनचं हादरुन गेलेलं आयुष्य पाहायला मिळतं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kapil sharma asked actor kartik aaryan about relationship status know the actor reaction video viral nrp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या