तामिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जम भीम’ हा चित्रपट २ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. चित्रपट एकापाठोपाठ रेकॉर्ड बनवत आहे. हा चित्रपट तामिळ भाषेत असला तरी सुद्धा हिंदीत या चित्रपटाला जास्त पसंती मिळाली आहे.

जय भीम चित्रपटाला आयएमडीबीवर सगळ्यात जास्त रेटिंड मिळाले आहेत. लक्षवेधी गोष्टी म्हणजे, या चित्रपटाने ऑल टाइम सुपरहिट द शॉशंक रिडंप्शन, द गॉडफादर सारख्या चित्रपटांना रेटिंगमध्ये मागे टाकलं आहे. जय भीमने सगळ्या चित्रपटांना मागे टाकत टॉप लिस्टमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. खरतरं जय भीम हा चित्रपट मुळचा तामिळ भाषेत आहे. मात्र, या चित्रपटाला तामिळ भाषेपेक्षा हिंदीत पाहण्यात लोक पसंती देत आहेत.

आणखी वाचा : माझे पणजोबा स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळेच मला…; कंगनाचा जुना व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जय भीमला १० पैकी ९.६ स्टार्स रेटिंगमध्ये मिळाले आहेत. तर द शॉशंक रिडेम्पशनला ९.३ आणि द गॉडफादर या चित्रपटाला ९.२ स्टार्स मिळाले आहे. दरम्यान, चित्रपटाला प्रदर्शित होऊन २ आठवडेच झाले आहेत. तर जय भीमने द शॉशंक रिडेम्पशनला आणि द गॉडफादर या चित्रपटांना लोकप्रियतेत मागे टाकलं असं म्हणणं कठीण आहे. कारण जय भीमला ८५ हजार व्होट्स मिळले आहेत. तर द शॉशंक रिडेम्पशनला २५ लाख व्होट्स आणि द गॉडफादर या चित्रपटाला १७ लाख व्होट्स मिळाले आहेत.