बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास नकार दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. मात्र, कपिलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही सगळी अफवा असल्याचं म्हटलं आहे. आता केआरकेने कपिल आणि अक्षय यांच्या या वादानंतर संपूर्ण एपिसोड पाहून त्याचे समिक्षण करणार असे म्हटले आहे.

या आधी जेव्हा अक्षयने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा कपिलने अक्षयने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर विनोद केला. अक्षयने नंतर चॅनलला विनंती केली की ते संभाषण कट करून एपिसोड प्रदर्शित करा. एपिसोड प्रदर्शित झाला तेव्हा त्यात कपिल आणि अक्षयमध्ये झालेलं ते संभाषण दाखवण्यात आलं नाही. पण, सोशल मीडियावर ती क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर अक्षय कपिलवर नाराज झाल्याचे म्हटले जात होते.

आणखी वाचा : “तुझं मुळ विसरू नकोस”, झोमॅटोच्या जाहिरातीवरून अल्लू अर्जुन झाला ट्रोल

दरम्यान, नुकतंच कपिलने ट्वीट करत ही सगळी अफवा असल्याचे कळले आहे. “माझ्या मित्रांनो, मी सोशल मीडियावरील अक्षय कुमारच्या संदर्भातील सर्व वृत्त पाहिली आणि वाचली आहेत. माझं अक्षय कुमारशी बोलणं झालं आहे आणि सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. हे केवळ गैरसमज होते. आता सर्व ठीक झालं असून आम्ही लवकरच ‘बच्चन पांडे’चा एपिसोड शूट करणार आहोत. तो माझा मोठा भाऊ आहे. त्यामुळे तो माझ्यावर कधीच रागावू शकत नाही. धन्यवाद”

Photo : पेडर रोडवरील प्रभुकुंज निवासस्थानातील ‘या’ घरात राहायच्या लतादीदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपिलच्या ट्वीटवर केआरके त्याची प्रतिक्रिया दिली आहे. “कपिल शर्माने अक्षय कुमारचा अपमान केला होता. तरी सुद्धा जर अक्षय कुमार जाणार असेल, तर मी पूर्ण एपिसोडचे समिक्षण करेन. मला आशा आहे की अक्षय स्वत: चा मान राखेल आणि कपिलपासून लांब राहणार”, असे ट्वीट केआरकेने केले आहे.