टीव्हीवर लवकरच कपिलचं पुनरागमन पण…

शोमध्ये करण्यात येणार काही अनोखे बदल

kapil sharma
कपिल शर्मा

कॉमेडियन कपिल शर्माचा आगामी चित्रपट ‘फिरंगी’ हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. रुपेरी पडद्यावर तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असला तरी छोट्या पडद्यावरील त्याच्या कॉमेडी शोची प्रेक्षक अजूनही आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच्या चाहत्यांसाठी ही खूशखबर आहे की, कपिल छोट्या पडद्यावर एका नव्या शोसह पुनरागमन करणार आहे. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये सुनील ग्रोवर मात्र नसेल.

नवीन शोमध्ये सुनीलने त्याची साथ द्यावी यासाठी कपिलने माफीचा मेसेज त्याला पाठवल्याची चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये ऐकायला मिळाली. मात्र, त्याने असा कोणताही मेसेज सुनीलला पाठवला नसल्याचं कपिलशी निगडीत सूत्रांनी स्पष्ट केलं.

गेल्या तीन वर्षांपासून टेलिव्हिजनवर कॉमेडीचा किंग राहिलेल्या कपिलने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. कॉमेडीची तीच सफर आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या शोबद्दल कपिल म्हणाला की, ‘या नवीन शोमध्ये माझी एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘फिरंगी’मध्ये ज्याप्रकारे मी एक वेगळी भूमिका साकारली, त्याचप्रमाणे नवीन शोच्या माध्यमातून एक अनोखा कपिल चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.’

सुनीलला त्याच्या शोमध्ये आणण्यास कपिल प्रयत्न करणार का आणि त्याच्या प्रयत्नांना यश मिळेल का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. कपिलसोबत झालेल्या वादानंतर सुनीलने त्याचा शो सोडला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kapil sharma is coming up with a big show on tv but without sunil grover