बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने शनिवारी २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सोनम कपूरने तिच्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. सोनम कपूरच्या या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबाच्या घरात मोठा आनंद पाहायला मिळत आहे. सोनम कपूरच्या या गुडन्यूजनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत. बॉलिवूड निर्माता करण जोहरने सोनम कपूरचे कौतुक करताना अनिल कपूर यांच्याबद्दलही एक विधान केले आहे.

सोनम कपूरने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर अनेक जण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे अनेक कलाकार तिचे अभिनंदनही करताना दिसत आहे. नुकतंच निर्माता करण जोहरने इन्स्टाग्रामद्वारे सोनम कपूरला शुभेच्छा दिल्या आहे. सोनम कपूरचे अभिनंदन करण्यासाठी त्याने इन्स्टाग्रामवरुन एक लाईव्ह व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने तिला एका हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने संपूर्ण कपूर कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.

या शुभेच्छा देताना त्याने सोनमची बहीण रिया कपूर आणि तिचा नवरा करण बुलानी यांच्याशिवाय सोनम कपूर, आनंद, अनिल कपूर आणि सुनिता यांचाही उल्लेख केला. सोनम कपूरचे अभिनंदन करण्यासाठी केलेल्या या लाईव्ह व्हिडीओत त्याने अनिल कपूर यांच्याबद्दल एक विधान केले आहे. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे.

माझा विश्वास बसत नाही की सोनम आता आई झाली आहे. पण मला वाटत नाही की अनिल कपूर यांना आजोबा म्हटलेलं आवडेल कारण ते अजूनही तरुण आहेत, असे करण जोहर या व्हिडीओत म्हणाला. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला होता. त्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.