बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहरने नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. करणने आतापर्यंत अनेक सुपरडिट तर काही फ्लॉप असे चित्रपट दिले आहेत. तो बऱ्याचवेळा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेचा विषय ठरतो. पण आता करणने त्याचा कोणी पार्टनर नाही अशी खंत व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’

करणने नुकतीच ‘फिल्म कंपॅनिअन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अनुपमा चोप्रा यांनी करणला आयुष्यात कोणत्या गोष्टीची खंत वाटते असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देत करण म्हणाला, “माझ्या आयुष्यात एकच खंत मला जाणवते ती म्हणजे लाईफ पार्टनर नसण्याची. मी माझ्या पर्सनल आयुष्याकडे लक्ष न देण्याचा निर्णय घेतला आणि मला आता त्याचा पश्चाताप होतं आहे. एक पालक म्हणून मी आज समाधानी आहे. मी अजून पाच वर्षांआधी मुलां विषयी निर्णय घेतला असता तरीही चाललं असत, पण त्यातही मी उशीर केला. पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत हीच आहे की एक निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून मी प्रोफेशनली जितक्या गोष्टींकडे लक्ष दिलं, एक साम्राज्य उभं करण्यासाठी जेवढं लक्ष दिल तेवढंच मी माझ्या खासगी आयुष्याकडे द्यायला हवं होतं. मला स्वतःला आणि माझ्या खाजगी आयुष्याला अनेकदा नमतं घ्यावं लागलं आणि जेवढं लक्ष द्यायला हवं होतं तेवढं तिकडे दिलं नाही असं मला वाटतं. आता या गोष्टीला खूप उशीर झाला आहे. आता या टप्प्यावर येऊन मी लाईफ पार्टनर शोधणं बरोबर नाही. त्यावर लक्ष द्यायची वेळ आता निघून गेली.”

आणखी वाचा : “नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा…”, वट पोर्णिमेच्या निमित्ताने हेमांगी कवीने शेअर केली खास पोस्ट

आणखी वाचा : ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप झाल्याचा अक्षय कुमारला बसला फटका, ‘धूम ४’ मधून अक्कीचा पत्ता कट?

करणने त्याच्या पन्नासाव्या वाढदिवशी बहुचर्चित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहिर केली. या चित्रपट रणवीर आणि आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar says not having a life partner is his deepest regret it s too late for me now dcp
First published on: 16-06-2022 at 10:13 IST