बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर हा दोन मुलांचा बाप आहे. करणच्या दोन्ही मुले यश आणि रुही यांचा जन्म २०१७ मध्ये सरोगसीद्वारे झाला. करण त्याच्या दोन्ही मुलांच्या खूप जवळ आहे. तो अनेकदा त्यांच्यासोबत वेळ घालवताना दिसतो. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. करणने नुकतंच त्याचा मुलगा यशचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

करण जोहरचा छोटा मुलगा यश हा या व्हिडीओत चक्क शेफ बनलेला दिसत आहे. यशने त्याच्या डोक्यावर शेफची टोपी, अॅप्रन घातलेला दिसत आहे. हे कपडे परिधान करुन तो त्याच्या स्वयंपाकघरात चक्क सँडविच बनवताना दिसत आहे. करण जोहरने शेअर केलेल्या या व्हिडीओत यश हा सुरुवातीला ब्रेडला बटर लावताना दिसत आहे. त्यानंतर तो त्याच्यावर काकडी आणि टोमॅटोचे तुकडे ठेवताना दिसत आहे. करण जोहरने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

करण जोहरने यापूर्वीही त्याच्या मुलाचे अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याच्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. लहानग्या यशचा आनंद पाहून अनेक सेलिब्रेटीही त्याच्या प्रेमात पडले आहेत. अभिनेत्री कतरिना कैफनेही यशच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने हार्ट आणि स्माईलची इमोजी शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरिनासोबतच फराह खान, संजय कपूर, सीमा खान, श्वेता बच्चन, नीतू सिंग, सोनी राजदान यांच्यासह अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. करणच्या मुलाचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे.