बिपाशा बासू व करण सिंह ग्रोवर सुखाचा संसार करत आहेत. लवकरच या सेलिब्रिटी कपलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. पण लग्नापूर्वीच करण त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत होता. हे त्याचं तिसरं लग्न आहे. याआधी अभिनेत्री जेनिफर विंगेटला डेट करत तिच्याशी लग्न करण्याचा त्याने निर्णय घेतला. पण या दोघांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली. दोन वर्षांमध्येच या जेनिफर-करणचा घटस्फोट झाला. इतकंच नव्हे तर जेनिफरने करणवर फसवणूकीचा आरोपही केला होता.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

जेनिफर ही करणची दुसरी पत्नी होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार करणला जेनिफरने एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर रंगेहात पडकलं होतं. आपल्या पतीला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर पाहिल्यानंतर जेनिफरला राग अनावर झाला. तिने रागात त्याच्या कानाखाली मारली होती.

‘दिल मिल गए’ मालिकेच्या सेटवर जेनिफरने त्याच्या कानाखाली मारली असल्याची बातमी सगळीकडे तेव्हा वाऱ्यासारखी पसरली होती. या प्रसंगानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. इतकंच नव्हे तर ‘दिल मिल गए’ मालिकेमध्ये एकत्र सीन चित्रीत करण्यासही या दोघांचा नकार होता. एक्स गर्लफ्रेंड निकोलसाठी करण त्याची पहिली पत्नी श्रद्धाला टाळत असल्याचं काही काळानंतर जेनिफरला समजलं.

आणखी वाचा – दीपिका पदुकोणची प्रकृती बिघडली, मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर असल्यामुळे करणचे दोन्ही घटस्फोट झाले. जेव्हा करणने पहिली पत्नी श्रद्धा निगमबरोबर लग्न केलं तेव्हा तो कोरियोग्राफर निकोलला डेट करत होता. याबाबत त्याने स्वतः खुलासादेखील केला. पहिल्या पत्नीशी घटस्फोट आणि निकोलशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने जेनिफरला डेट करण्यासा सुरुवात केली होती. जेनिफरबरोबर घटस्फोट झाल्यानंतर ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर करण-बिपाशा यांच्यामध्ये जवळीक वाढली. सध्या हे दोघं त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये रमले आहेत.