गरोदर झाल्यापासून करिना कपूर खान काहीनाकाही कारणाने चर्चेत असते. कधी प्रोजेक्ट बेबी बंपद्वारे, तर कधी बेबी बंपसह रॅम्पवॉक करून सतत चर्चेत राहणाऱ्या करिनाने आपल्या गरोदरपणाविषयी आणखी एक खुलासा केला असून, आपल्या खाण्यापिण्याच्या इच्छेबाबत तिने एक अनोखी गोष्ट जाहीर केली आहे. पेस्ट्री, चॉकलेट अथवा अशाच प्रकारच्या खाद्यपदार्थाचे तिने नाव घेतले असेल असा जर तुम्ही अंदाज बांधत असाल, तर तुमचा हा अंदाज सपशेल चुकीचा ठरणार आहे. होय बेगम बेबोला सध्या कारल्याचे डोहाळे लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिध्द न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन रुजुता दिवेकरशी साधलेल्या ऑनलाइन संवादात करिनाने आपले अनुभव शेअर केले आहेत. आपल्याला कारले खाण्याची इच्छा होत असल्याचे सांगत ती म्हणाली, मला कडू आणि तिखट खाण्याची इच्छा होते. यात लोहाची मात्रा जास्त असून, ते फायदेशीर ठरते. लंचमध्ये माला दुधीभोपळा आणि मटार आवडतात. भारतीय आणि घरगुती मिठाई खाण्याचे माझे मन करते. यात बेसनाचा लाडू आणि पेढा माझे आवडते आहे. आरोग्यवर्धक आहार घेण्यावर माझा भर असतो, असे ती म्हणाली.

सहज उपलब्ध होणाऱ्या आणि परवडणाऱ्या गावठी भाज्या आपल्याकडे उपलब्ध असतात. विदेशी खाणे खाण्यापेक्षा या भाज्या खाव्यात. मी आयुष्यभर केवळ ब्रोकोली आणि पालक खाऊन राहू शकत नाही, अशी भावनादेखील तिने व्यक्त केली. करिना डिसेंबरपर्यंत बाळाला जन्म देणारल असल्याचा अंदाज डोक्टरांनी वर्तवला आहे.

अलिकडेच ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये रॅम्पवॉक करून ती चर्चेत आली होती. यावेळी डिझायनर सब्यसाचीसाठी तिने रॅम्पवॉक केले होते. आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या करिनासाठी पोटातील बाळासह रॅम्पवॉक करण्याचा अनुभव खास होता. येऊ घातलेल्या बाळासह पहिल्यांदा रॅम्पवर चालत असल्याने माझ्यासाठी हा रॅम्पवॉक नेहमीच लक्षात राहील, अशा शब्दांत भावूक झालेल्या करिनाने आपले मनोगत व्यक्त केले होते. मी एकटी नसून, आता तर आम्ही दोघं असल्याचे करिना पोटातील बाळाला उद्देशून म्हणाली होती. हा क्षण नेहमीच माझ्या लक्षात राहील. याक्षणी आपण खरंच भावूक झाले असल्याचे म्हणत तिने आपल्या भावनांना वाट करून दिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor said i am craving for karela these day
First published on: 21-09-2016 at 12:22 IST