बॉलिवूडची बेबो करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचे लाखो चाहते आहेत. करीना ही अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया कपूरची जवळची मैत्रिण आहे. बऱ्याचवेळा त्या दोघी एकत्र दिसतात. दरम्यान, रिया आता करोना पॉझिटिव्ह असून ती होम क्वारंटीनमध्ये आहे. अशात त्या दोघी भेटू शकत नसल्याने सोशल मीडियावर त्या एकमेकांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, त्यांचे चॅट करीनाने लीक केले आहेत.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून त्यांच्या चॅटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. यात रिया करीनाला बोलताना दिसते की तुला हॉट चॉकलेटसोबत क्रीमसोबत पाठवू का? करीना यावर उत्तर देत बोलते, नको नको मला नाही आवडतं. त्यावर रिया बोलते, हॉट फज सॉस आणि व्हॅनिला आयस्क्रिम? तेव्हा करीना होकार देते आणि बोलते हे चालेल. तेव्हा रिया बोलते की ठीक आहे मी बिस्किट आणि हॉट फज पाठवते तू व्हॅनिला आयस्क्रिम मागाव. रियासोबत असलेले हे चॅट करीनाने शेअर केले आणि म्हणाली, ‘मला आमच्यात झालेला हा संवाद आवडला.’

आणखी वाचा : सारा तेंडुलकर आणि शुभमन गील एकत्र बीचवर? दोघांनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चा

आणखी वाचा : झुलन गोस्वामींच्या बायोपिकमधून अनुष्का करणार कमबॅक, पण टीझर पाहताच नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीना २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात दिसली होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन रिया कपूरने केले होते. एवढचं काय तर त्या दोघी बऱ्याचवेळा एकमेकांसोबत दिसतात. दरम्यान, करीना लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.