कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरने आगामी ‘फितूर’ चित्रपटसाठी तीन मिनिटांचा किसींग सीन दिला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य आणि कतरिनाचा तब्बल तीन मिनिटांचा किसींग सीन चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. आदित्य कपूरचा हा किसींग सीन त्याच्या बॉलिवूड करियरमधील सर्वात मोठा किसींग सींन असल्याचे समजते. मुंबईतील एका स्टुडिओमध्ये हे दृश्य चित्रीत करण्यात आले. त्यावेळी काही नेमक्याच लोकांना सेटवर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. कतरिना आणि आदित्य यांच्यात चांगले मैत्रीचे संबंध असल्याने त्यांना हे दृश्य चित्रीत करणे सोयीस्कर गेले. आदित्य आणि कतरिनाची ही जोडी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे.
अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफची ‘फितूर’ या चित्रपटात मुख्य भूमिका असून हा रोमॅण्टीक चित्रपट येत्या १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2016 रोजी प्रकाशित
कतरिनाने आदित्यसोबत दिला ३ मिनिटांचा किसींग सीन
त्यांना हे दृश्य चित्रीत करण्यात जास्त अडथळा आला नाही.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 06-02-2016 at 16:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina and aditya share a three minute long kissing scene in their film fitoor