बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून कतरिना कैफला ओळखले जाते. कतरिना कैफ ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असून तिचे लाखो चाहते आहेत. तिचं सौदर्य आणि तिच्या डान्सवर चाहते फिदा आहेत. बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कतरिनाने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स केले. त्याचबरोबर तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांपूर्वी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट या ठिकाणी ते विवाहबंधनात अडकले. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. यानंतर काही दिवसांपूर्वी ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यादरम्यान कतरिनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात कतरिनाने तिच्या भविष्याबद्दल आणि बाळांबद्दल मोठा खुलासा केला होता.

“कुटुंबाने काम न करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला कारण…”, ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणींचा खुलासा

कतरिनाने या व्हिडीओत म्हटले होते की, “माझ्या मुलांना त्यांचे आई-वडील दोघांची सोबत मिळावी, अशी माझी इच्छा आहे. मी लहान असताना माझी आई सुझैन आणि वडील मोहम्मद कैफ यांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात वडिलांची उणीव नेहमीच जाणवते. माझ्या आईने एकटीनेच आठ मुलांचा सांभाळ केला.”

त्यापुढे ती म्हणाली, “मला माझ्या आयुष्यात नेहमीच वडिलांची उणीव जाणवते. मी याकाळात फार दु:ख सोसलं आहे. त्यामुळे माझ्या मुलांना ही कमतरता कधीही जाणवू नये, असे मला वाटतं. वडील नसल्यानंतर तुमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण होते, ती कोणीही भरुन काढू शकत नाही. त्यामुळे जेव्हा मला मुलं होतील, तेव्हा त्यांना अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही याची मी विशेष काळजी घेईन.”

छत्रपती शिवरायांच्या ‘या’ तडफदार सेनानीवर साकारणार महेश मांजरेकर आगामी चित्रपट

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून हृता दुर्गुळेची एक्झिट, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

“माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी असे अनेक भावनिक क्षण आले, ज्याचा मला खूप त्रास झाला. ज्यांना वडील आहेत आणि ज्या लोकांना दोन्हीही पालकांचे प्रेम मिळाले आहे. पण हे तितकंच खरं आहे की, मला इतक्या बहिणी असल्यामुळे माझ्याकडे नेहमीच स्वतःची गर्ल गॅंग होती. मला मैत्री करण्यासाठी कधीही घरातून बाहेर पडावे लागले नाही. मला माझ्या वयाच्या ६० व्या वर्षी स्वत:च्या मुलं आणि त्यांच्या मुलांच्या मुलांसोबत खेळायचे आहे”, असेही तिने यावेळी म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कतरिना लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटात सलमान खानसोबत झळकणार आहे. सध्या याचे शूटींग बाकी आहे. तर विकी कौशल हा सारा अली खानसोबत ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात दिसणार आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.