लंडनच्या प्रसिद्ध मादाम तुसाँ म्युझियममध्ये आता बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने स्थान मिळवले आहे. कतरिना कैफच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
तिची प्रतिकृती असलेल्या मेणाच्या पुतळ्यावर समोर येताच, हा पुतळा हुबेहुब माझ्यासारखाचं दिसत आहे अशी प्रतिक्रीया कतरिनाने दिली. मादाम तुसाँ म्युझियममध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, माधुरी दीक्षित-नेने, सलमान खान, ऋतिक रोशन, ऐश्वर्या राय बच्चन यांचे देखील पुतळे आहेत. या कलाकारांच्या यादीत आता कतरिनाचाही समावेश झाला आहे. बॉलिवूडच्या प्रियंका चोप्रा, दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफ या तिघींपैकी म्युझियममध्ये कोणाचा पुतळा ठेवला जावा याकरिता पोल घेण्यात आले होते. यात कतरिनाने बाजी मारली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2015 रोजी प्रकाशित
मादाम तुसाँमध्ये कतरिनाचा मेणाचा पुतळा
लंडनच्या प्रसिद्ध मादाम तुसाँ म्युझियममध्ये आता बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने स्थान मिळवले आहे.
First published on: 28-03-2015 at 04:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif unveils her wax statue at madame tussauds