‘कौन बनेगा करोडपती १३’ या शोला नुकतीच सुरुवात झाली असून सध्या या शोची जोरदार चर्चा आहे. यंदाच्या सिझनची खासियत म्हणजे या शोमध्ये दर शुक्रवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती शोमध्ये हजेरी लावणार आहेत. येत्या आठवड्यात म्हणजेच ३ सप्टेंबरच्या खास भागात माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि भारतीय संघाचा माजी कप्तान तसंच बीसीसीआय चीफ सौरव गांगुली गेस्ट म्हणून हजेरी लावणार आहेत.

सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासोबत पार पडलेला एपिसोड धमाकेदार असणार आहे. याचीच एक झलक नुकत्याच रिलीज झालेल्या एका प्रोमोमध्ये पाहायला मिळतेय. या प्रोमोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन विरेंद्र सेहवागला वेगवेगळ्या परिस्थितीवर विरूची प्रतिक्रिया काय असते हे विचारत आहेत. यावर आपल्या जबरदस्त अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या विरेंद्र सेहवागने अशी उत्तर दिली आहेत. की बिग बींना देखील हसू आवरणं कठिण झालं.

हे देखील वाचा: “निर्मात्यांनी बावळटपणाचा आव आणण्याचा सल्ला दिला”; हर्षवर्धन कपूरचा खुलासा

या प्रोमोत बिग बी सेहवागला पाकिस्तानसोबत सामना जिंकल्यावर काय प्रतिक्रिया असते असा प्रश्न विचारतात. यावेळी उत्तर देत सेहवागने बिग बींच्या ‘शेहनशहा’ सिनेमाच्या डायलॉगची आठवण करून दिली. बिग बी यांच्या ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है’ या डायलॉगनंतर विरेंद्र सेहवाग म्हणाला, “आम्ही तर त्यांचे बाप आहोतच”हे ऐकताच बिग बी आणि सौरव गांगुलीसह सर्वांमध्ये एकच हशा पिकला.

याशोमध्ये बिग बींनी विरेंद्रला जर कॅच मिस झाला तर? असा सवाल करताच विरेंद्रने कोच ग्रेग चॅपल यांचं नाव घेत सौरवकडे मिश्किलपणे इशारा करत गाणं गायलं. यावर सौरव गांगुलीची प्रतिक्रियादेखील पाहण्यासारखी आहे. विरेंद्रने पुन्हा सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपल यांच्यातील वादावरून सौरवला गाणं गात चिमटा काढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शानदार शुक्रवार’ या खास भागत दाद आणि विरू यांची जोडी बिग बींसोबत धमाल करणार हे या प्रोमोवरून लक्षात येतंय. त्यामुळे प्रेक्षक आता हा खास एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत.