ज्यांच्या नावावरून चित्रपटाबाबत अपेक्षा ठेवावी अशा आजच्या काही मोजक्या दिग्दर्शकांत केतन मेहताचा समावेश होतो. ‘सरदार’, ‘ओ डार्लिंग यह है इंडिया’, ‘माया मेमसाब’, ‘आर या पार’ आणि  ‘मंगल पांडे’ अशा काही चित्रपटांमुळे केतन मेहताची तशी ओळख निर्माण झाली. आता तो ‘मान्जी-द-माऊन्टेन मॅन’ हा पर्वतरोहक दशरथ मंजू यांच्या आयुष्यावरील चित्रपट घेवून आपल्या समोर येत आहे. नवाजउद्दीन सिद्दीकी याने ही शीर्षक भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत राधिका आपटे, पंकज त्रिपाठी, प्रशांत नारायण आणि गौरव द्विवेदी इत्यादींच्या प्रमूख भूमिका आहेत.
आपल्या या नवीन चित्रपटाबाबत केतन मेहता सांगतो, यावेळी विषयाच्या आव्हानासोबतच माझ्यासमोर चित्रीकरणाचेही आव्हान होते. पण समोर एखादे आव्हान असल्याशिवाय आपल्याकडून चांगले कामदेखिल होत नसते. केतन मेहता तद्दन फिल्मी कधीच नव्हता त्यामुळे त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही.