कन्नड सुपरस्टार यशने मालिकांमध्ये काम करत मनोरंजन क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. २००७ मध्ये त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. २०१८ मध्ये दिग्दर्शक प्रशांत नील यांचा ‘केजीएफ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. चित्रपटामध्ये यशच्या कामाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. तब्बल चार वर्षांनंतर ‘केजीएफ २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘केजीएफ २’ने आधीच्या चित्रपटापेक्षा जास्त रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. ‘केजीएफ’ फ्रेन्चायझीमुळे यश ग्लोबल स्टार बनला आहे.

यशचे चाहते आता ‘केजीएफ ३’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. केजीएफ फ्रेन्चायझीबद्दल सुरु असलेल्या चर्चेवर त्याने एका कार्यक्रमामध्ये मत मांडले. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या इंडिया टूडेच्या कार्यक्रमामध्ये त्याने हजेरी लावली होती. तेव्हा तो म्हणाला, “माझ्या आगामी चित्रपटांबद्दल सध्या सर्वजण बोलत आहेत. ‘केजीएफ ३’ साठी आम्ही एक योजना आखली आहे. पण ती सुरु व्हायला अजून अवकाश आहे. मागील ६-७ वर्षांपासून मी या फ्रेन्चायझीमधले चित्रपट करत आहे. आता मला काहीतरी वेगळं करायचं आहे. जर सर्वकाही ठरवल्याप्रमाणे घडलं तर, काही वर्षांनी ‘केजीएफ ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

आणखी वाचा – “माफ करा…” सलमान खानबद्दलचा प्रश्न विचारताच शाहरुख खानने दिली प्रतिक्रिया

या कार्यक्रमामध्ये अनेक नेते आणि राजकीय पक्षांमधील अधिकारीही उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये त्याला ‘तुला राजकारणामध्ये सहभाग घ्यायला आवडेल का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने “सर्वप्रथम मला माझ्यामध्ये आणि माझ्या कन्नड इंडस्ट्रीमध्ये चांगले बदल करायचे आहेत. मर्यादेमध्ये राहून मला समाजाच्या कल्याणासाठी पूरक असं काम करायचं आहे. काही लोकांच्या आयुष्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राजकारण हे कृतघ्नेने करायचे काम आहे आणि सध्या मी राजकारणामध्ये येऊ इच्छित नाही”, असे वक्तव्य केले.

आणखी वाचा – विमानतळावर हुबेहुब दिसणारा चाहता पाहून गोविंदा गोंधळला; पत्नी म्हणाली, “कार्बन कॉपी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत अनेक सिनेकलाकारांनी राजकारणामध्ये आपले नशीब आजमावले आहे. स्मृती इराणी, एनटीआर रामा राव, जयललिता, जया बच्चन, हेमा मालिनी, मनोज तिवारी अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी अभिनय क्षेत्रामध्ये नाव कमावल्यानंतर राजकारणामध्ये प्रवेश केला आहे.