बॉलीवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांनी काल वयाची त्र्याहत्तरी पूर्ण केली. त्यापाठोपाठ आता बॉलीवूडचे तिन्ही खानसुद्धा यावर्षी वयाची पन्नाशी गाठत आहेत.
आपल्या वाढदिवसानिमित्त काल अमिताभ यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी तिन्ही खानांच्या बॉलीवूडवर असलेल्या वर्चस्वाबद्दल आम्ही त्यांना प्रश्न विचारला. त्यावर अमिताभ म्हणाले की, ते खूप चांगलं काम करतायतं. पुढेही असेचं काम त्यांनी करत राहावे अशी माझी इच्छा आहे. अनेकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळतेय. प्रेरणा घेण्यासाठी हे तिघही चांगले स्त्रोत आहेत. माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. इतकेच नाहीतर अमिताभ यांनी वयाची पन्नाशी पूर्ण करत असलेल्या य़ा खान बंधूंना आधीचं वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या.
आमिर मार्चमध्ये पन्नास वर्षांचा झाला असून, शाहरुखचा नोव्हेंबर तर सलमानचा डिसेंबरमध्ये वाढदिवस आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2015 रोजी प्रकाशित
बॉलीवूडचे तिन्ही खान अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत- अमिताभ बच्चन
अमिताभ यांनी वयाची पन्नाशी पूर्ण करत असलेल्या खान बंधूंना आधीचं वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 12-10-2015 at 10:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khans are an inspiration to many amitabh bachchan