हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनसारखं दिसणं मॉडेलला महागात पडलं आहे. किम कार्दशियनसारखं सौंदर्य मिळवण्यासाठी अनेक प्लास्टिक सर्जरी केलेल्या क्रिस्टीना एश्टनचं ३४व्या वर्षी निधन झालं आहे. प्लास्टिक सर्जरीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

क्रिस्टीना एश्टन ही किम कार्दशियनची हमशकल म्हणून ओळखली जायची. हुबेहुब किम कार्दशियनसारखं दिसण्यासाठी तिने जगभर फिरुन अनेक प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्या होत्या. सर्जरी केल्यानंतर ती हुबेहुब किम कार्दशियनसारखी दिसू लागली होती. त्यानंतर तिच्या फॅन फॉलोविंगमध्येही प्रचंड वाढ झाली होती. क्रिस्टीनाचे इन्स्टाग्रामवर सहा लाखांहून अधिक फॉलोवर्स होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रिस्टीना एश्टनच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. “२० एप्रिलला पहाटे ४.३१च्या सुमारास कुटुंबातील एका व्यक्तीचा फोन आला. क्रिस्टीना मरत आहे…असं तो फोनवर म्हणत होता. तिच्या निधनाने आमच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे,” अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली आहे.