अभिनेत्री किर्ती कुल्हारी ही तिच्या प्रतिभावान अभिनयामुळे ओळखली जाते. किर्तीने आज पर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. वेब सीरिज असो किंवा चित्रपट तिच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकते. मात्र, एवढं चांगली अभिनेत्री असूनही तिच नावं आघाडीच्या अभिनेत्रींसोबत का घेतलं जातं नाही? असा प्रश्न हा नेहमीच समोर येतो. या प्रश्नाचं उत्तर आता स्वत: किर्तीने दिलं आहे.
किर्तीने नुकतीच स्पॉटबॉयला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत किर्तीने तिच्या करिअरवर भाष्य केलं आहे. किर्तीला मसाला चित्रपटांमध्ये काम करायलला आवडेल का? असा प्रश्न विचारता “बॉलिवूडमध्ये मसाला चित्रपट करण्यासाठी अनेकजण आहेत, परंतु मी जे करते तसं काम करण्यासाठी पुरेसे लोक इथे नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की मी जे काही चित्रपट करतेय ते करण्याचं आणि सांभाळण्याचं काम मला करू द्या आणि इतर लोक दुसरं काम करण्याची जबाबदारी घेऊ शकतात,” असे किर्ती म्हणाली.
View this post on Instagram
आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट
किर्तीने आजवर ‘पिंक’, ‘उरी- द सर्जीकल स्ट्राईक’, ‘इंदू सरकार’ अशा अनेक हीट चित्रपटांत काम केले. तिने नाटकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने लहानमोठ्या जाहिराती आणि मालिकांमध्ये देखील काम केले. ‘फोर मोर शॉट्स प्लिज’, ‘बार्ड ऑफ ब्लड’, ‘क्रिमिनल जस्टीस’ या वेब सीरिजमधून ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती.