बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. इन्स्टाग्राम पोस्ट आणि व्हायरल व्हिडीओमुळे दोघंही अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. दोघांच्या वयातील फरकामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही व्हावं लागतं. मात्र यांमुळे मलायका किंवा अर्जुनला फारसा पडत नाही. दोघंही अनेक मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दल वेगवेगळे खुलासे करताना दिसतात. आताही अर्जुननं एका चॅट शोमध्ये मलायकाबाबत मोठा खुलासा केला आहे.

अर्जुन कपूरनं नुकतीच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ शोमध्ये बहीण सोनम कपूरसोबत हजेरी लावली. या शोचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या प्रोमोची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या शोमध्येच अर्जुन कपूरनं गर्लफ्रेंड मलायका अरोराबद्दल एक गुपित उघड केलं आहे.

आणखी वाचा- मलायकाच्या व्हिडीओतील ‘तो’ ठरतोय सर्वांच्या नजरेत हिरो, ‘या’ कृतीचं होतंय कौतुक

दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा एक नवीन प्रोमोमध्ये अर्जुन आणि सोनम कपूर यांची जोडी प्रेक्षकांना हसवताना दिसत आहे. या शोमध्ये सोनम कपूरने भाऊ अर्जुनला खूप ट्रोल केलं, तर अर्जुनने गर्लफ्रेंड मलायका अरोराशी संबंधित एक गुपितही सांगितलं. दर गुरुवारी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नीप्लस हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये याआधी आमिर खान आणि करीना कपूर या शोमध्ये दिसले होते.

‘कॉफी विथ करण’मध्ये सोनम कपूर अर्जुन कपूरची खिल्ली उडवताना दिसत आहे. यावर अर्जुन कपूर म्हणतो, सोनम कपूरकडून ट्रोल होण्यासाठी मला इथे बोलावले आहे का? याच शोमध्ये अर्जुन कपूरने गर्लफ्रेंड मलायकाचा नंबर कोणत्या नावाने त्याच्या फोनमध्ये सेव्ह आहे याचा खुलासा केला आहे. करणच्या प्रश्नावर अर्जुन कपूर म्हणतो, मला तिचं मलायका हे नाव आवडतं म्हणूनच मी तिच्या याच नावाने तिचा नंबर सेव्ह केला आहे.

आणखी वाचा- Video : सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावर भडकला शाहरुख खान, आर्यनच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती मागच्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असून दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. यामुळे त्यांना बऱ्याचदा ट्रोलही केलं जातं. याशिवाय वयातील फरकामुळेही या दोघांवर अनेकदा टीका होताना दिसते. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.