कित्येक वर्ष काम नाही, आर्थिक परिस्थिती बिकट अन्...; संजय कपूर यांच्या पत्नीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा | koffee with karan 7 maheep kapoor talk about family financial condition says husband sanjay kapoor has no work for few year see details | Loksatta

कित्येक वर्ष काम नाही, आर्थिक परिस्थिती बिकट अन्…; संजय कपूर यांच्या पत्नीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

कपूर कुटुंबाशी नातं असलं तर संजय कपूरला बऱ्याच कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. याबाबतच त्याच्या पत्नीने ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये खुलासा केला आहे.

कित्येक वर्ष काम नाही, आर्थिक परिस्थिती बिकट अन्…; संजय कपूर यांच्या पत्नीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा
कपूर कुटुंबाशी नातं असलं तर संजय कपूरला बऱ्याच कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. याबाबतच त्याच्या पत्नीने 'कॉफी विथ करण ७' या शोमध्ये खुलासा केला आहे.

‘कॉफी विथ करण ७’ या करण जोहरच्या कार्यक्रमामध्ये काही दिवसांपूर्वी संजय कपूरची पत्नी महीप कपूरने हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले. त्याचबरोबरीने संजय कपूर यांच्याकडे मध्यंतरीच्या काळामध्ये काहीच काम नसल्याचंही तिने यावेळी सांगितलं. तसेच कपूर कुटुंबामध्ये राहत असूनही आर्थिक परिस्थिती कशी कमजोर होत गेली याबाबत महीपा स्पष्टपणे बोलली.

आणखी वाचा – कतरिना कैफबरोबर परदेशात गेला होता रणबीर कपूर, अफेअरदरम्यानचे ‘ते’ खासगी फोटो व्हायरल झाले अन्…

काय म्हणाली महीप कपूर?

“एक वेळ अशी होती संजय कपूर यांच्या हाती काही काम नव्हतं. ते बरीच वर्ष घरीच होते. आर्थिक परिस्थितीही बिकट झाली होती. माझी मुलं ग्लॅमर आणि अशाप्रकारची परिस्थिती पाहत मोठी झाली आहेत.” संजय कपूर यांच्या हाती कामच नसल्याने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक परिस्थितीचाही सामना करावा लागला होता.

महीप पुढे म्हणाल्या, “त्यावेळी मला तुम्ही कपूर कुटुंबातील एक अयशस्वी भाग आहात हे माझ्या आजूबाजूच्या लोकांनी जाणवून दिलं.” कपूर कुटुंबात राहत असतानाही बऱ्याच कठीण प्रसंगांना संजय कूपर आणि त्यांच्या कुटुंबियांना सामोरं जावं लागलं.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

संजय कपूर बोनी कपूर व अनिल कपूर यांचे छोटे भाऊ आहेत. महीप व संजय कपूरची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मला त्यांच्यासारखं वडील व्हायचं नाही, कारण…”,  रणबीरने ऋषी कपूर यांच्याबद्दल केलं होतं मोठं वक्तव्य

संबंधित बातम्या

अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आणि जॅकी श्रॉफची अनेक वर्षांनी झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
“आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
२५ वर्षांपूर्वीचा ‘तो’ वादग्रस्त न्यूड फोटो पुन्हा शेअर करत मिलिंद सोमण म्हणाला..
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांकडून भाजपाचा प्रचार, काँग्रेस ECकडे करणार तक्रार
महिमा चौधरीची मुलगीही करणार बॉलिवूड पदार्पण? अरियाना म्हणाली, “माझ्या आईला…”
पुणे : जीएंच्या जन्मशताब्दीनिमित्त ११ डिसेंबरपासून दोन दिवसीय साहित्यिक कार्यक्रम
‘तेरा प्यार प्यार प्यार हुक्का….’ भर लग्नमंडपातच नवरा-नवरीला चढली झिंग, स्टेजवरच किस केलं अन्…; भन्नाट Viral Video पाहून चक्रावाल
Video : बायकोची दहशत! मराठी अभिनेत्रीने नवऱ्याकडे रागाने बघताच भांडी घासू लागला अन्…; व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू होईल अनावर