सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम कालपासून सुरु झाला आहे. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. यंदा या कार्यक्रमाच्या पहिल्या विशेष भागात मायलेकींचे बंध उलडगडणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या मंचावर अभिनेत्री काजोल ही तिच्या आईसह सहभागी होणार आहे. यानिमित्ताने काजोलने सिनेसृष्टीच्या प्रवासाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

आपल्या अभिनय कौशल्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून काजोलला ओळखले जाते. तिचे लाखो चाहते आहेत. काजोलने वयाच्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्यावहिल्या चित्रपटाने काजोल चांगली ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर तिचा ‘बाजीगर’ हा चित्रपट हिट ठरला आणि काजोलचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अजय देवगण नव्हे तर ‘हा’ अभिनेता होता काजोलची पहिली पसंती, एक झलक पाहण्यासाठी असायची उत्सुक

नुकतंच ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर काजोलने हजेरी लावली. यावेळी तिने चक्क मराठीत संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी काजोलला हिंदी सिनेसृष्टीबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यावर तिने “मला कधीही सिनेसृष्टीत यायचे नव्हते”, असा खुलासा केला.

“मी नेहमी हाच विचार करायचे की मी एक साधी सरळ नोकरी करणार, ज्या ठिकाणाहून मला चांगली ठराविक रक्कम पगार म्हणून मिळू शकेल. मला अशाप्रकारची नोकरी करायची होती”, असे काजोल म्हणाली.

त्यावर सचिन खेडेकर म्हणाले, “बरं झालं तुम्ही तो विचार केला नाहीत. अन्यथा आम्ही तुमच्या चांगल्या चांगल्या चित्रपटांना हुकलो असतो.” तर त्यावर तिची आई म्हणाली, “हिने नोकरी केली असती तर ऑफिसमधल्या लोकांचे काय झाले असते?” असा मजेशीर प्रश्न विचारला. त्यावर सर्वजण हसायला लागले.

‘तारक मेहता…’ मालिकेत तब्बल सहा वर्षांनी ‘गरबा क्वीन’ दयाबेन परतणार, प्रोमो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान येत्या शनिवारी ११ जूनला हा भाग प्रदर्शित होणार आहे. यात आपल्याला मायलेकींचा अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने काजोलचे अनेक गुपितही समोर येणार आहेत.