‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला जर मी हॉटसीटवर असतो/असते तर एवढी रक्कम नक्कीच जिंकली असती, असे वाटते. प्रेक्षक या शोची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. तर या शोचे ६ पर्व सोमवार ६ जूनपासून सुरु झाले आहे. कार्यक्रमाची सुरुवात ही एका विशेष भागापासून झाली होती. यावेळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध मायलेकींची जोडी अभिनेत्री तनुजा आणि अभिनेत्री काजोलने लावली होती. शोच्या प्रोमोचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी शोमध्ये मराठी बोलावं लागणार याची चिंता काजोलला सतावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : मलायकाच्या घरी पोहोचले पोलिस, व्हिडीओ व्हायरल होताच कारण आले समोर

व्हायरल झालेल्य व्हिडीओ ‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालक अभिनेते सचिन खेडेकर तनुजा आणि काजोल यांचे स्वागत करत असल्याचे दिसत आहे. ‘जोरदार टाळ्यांनी स्वागत करुया भारतीय चित्रपटसृष्टीचं सुंदर स्वप्न असलेल्या मायलेकी तनुजा आणि काजोल यांचं, असं म्हणतं खेडेकरांनी त्यांचे स्वागत केले. पुढे सचिन खेडेकर बोलतात, मी भरपूर प्रश्न मराठीमधूनच विचारणार आहेत. यावेळी गंमतीत उत्तर देताना काजोल म्हणते की, ‘मी अजिबात घाबरत नाही आहे’. यावर सचिन बोलतात ‘होना’ काजोल वारंवार सांगते की ‘तिला मराठीत बोलावं लागणार आहे याची अजिबात चिंता नाही आहे.’ पण अखेरीस ती मोठ्याने ‘मम्मी…’ ओरडते आणि तनुजा यांना मिठी मारते. सचिन खेडेकर यांचे मराठीतील प्रश्न समजून त्याचं उत्तर देणं काजोलसाठी कठीण ठरणार आहे. काजोलच्या अशा वागण्यानं मंचावर एकच हशा पिकतो.

आणखी वाचा : “विकीच्या जागी कोणी दुसरा असता…”, सुशांतच्या मृत्युनंतर आलेल्या अनुभवावर अंकिता झाली व्यक्त

आणखी वाचा : “अचानक १५० लोक मध्येच घुसले आणि…”, शरद पोंक्षेनी सांगितला होता ‘मी नथुराम गोडसे…’ नाटकाच्या प्रयोगाचा तो थरारक प्रसंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोल आणि तनुजा यांना पाहण्यासाठी तर प्रेक्षक उत्सुक आहेतच, शिवाय या पर्वातील कर्मवीर स्पेशल भागामध्ये प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका सुधा मूर्ती देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदाचा ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमाचा सहावा पर्व नक्कीच स्पेशल असणार आहे. याआधीच्या पर्वांमध्ये कर्मवीर स्पेशल भागांमध्ये नाना पाटेकर, आनंद शिंदे, मनोज वाजपेयी, मेधा पाटकर, सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.