बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना हा लोकप्रिय अभिनेता आहे. आयुषमान आणि अभिनेत्री वाणी कपूरचा ‘चंडीगढ़ करे आशिकी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता प्रेक्षकांना या चित्रपटाचा रिव्ह्यू जाणून घेण्याची इच्छा आहे. आता अभिनेता कमाल आर खानने या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. केआरकेने या चित्रपटाला चक्क सॉफ्ट पॉर्न म्हटलं आहे.

आयुषमान या वेळी देखील एक संदेश देणारा चित्रपट घेऊन आला आहे. मात्र, हा चित्रपट केआरकेच्या पसंतीस उतरला नाही. या चित्रपटाला रिव्ह्यू देत केआरकेने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये आयुषमानच्या या चित्रपटाला सॉफ्ट पॉर्न म्हटले आहे. “मला माफ करा पण मी चुकलो ‘चंदीगड करे आशिकी’ हा चित्रपट सॉफ्ट पॉर्न फिल्म नाही. खरं तर ही एक पंजाबी सॉफ्ट पॉर्न फिल्म आहे”, असे ट्वीट आयुषमानने केले आहे. केआरकेने हा चित्रपट पाहिल्यानंतर लगेच इंटरव्हलमध्ये रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली. त्याचे नाव ‘चंडीगढ करे आशिकी’ नसून ‘सेक्स इन चंदीगड’ असावे, असे त्याने सांगितले.

आणखी वाचा :विकी-कॅटच्या नवीन घराचा अनुष्काला होतोय त्रास

आणखी वाचा : आराध्या बच्चनची ‘ती’ भविष्यवाणी ऐकून बच्चन कुटुंबियांना बसला होता धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केआरके पुढे त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला, “या सॉफ्ट पॉर्न फिल्मच्या प्रत्येक डायलॉगमध्ये सेक्स या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाच नाव ‘सेक्स इन चंडीगढ असले पाहिजे. या चित्रपटात अश्लीलता आणि समलैंगिक संबंध दाखवण्यात आले आहेत आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मला वाटते की बॉलिवूडमध्ये बरेच समलैंगिक लोक काम करतात. याचा असा अर्थ नाही की समलैंगिक कथेवर चित्रपट बनवला पाहिजे. मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की लोक अशा प्रकारचे खराब चित्रपट पाहण्यासाठी जाणार नाहीत.”