scorecardresearch

“शूटींग संपल्यानंतर सर्वजण मला हकलून देतात”, ‘लागिरं झालं जी’मधील जयडीने सांगितला ‘तो’ किस्सा

त्यावेळी तिने मालिकेच्या सेटवर घडलेल्या किस्स्यांबद्दल खुलासे केले आहेत.

झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ ही मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. या मालिकेत अज्याचं फौजी होण्यापर्यंतचा प्रवास आणि शितलीसोबतच लग्न यामुळे ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी त्यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री पूर्वा शिंदे. ‘लागीरं झालं जी’ मालिकेत पूर्वाने जयडी ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. नुकतंच पूर्वाने एका मुलाखतीत सेटवरील काही गमतीशीर किस्से सांगितले आहेत.

अभिनेत्री पूर्वा शिंदे ही ‘लागीरं झालं जी’ मालिकेमुळे घराघरात पोहोचली. सध्या ती कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत खलनायक भूमिकेत झळकत आहे. तीची ही भूमिकाही प्रचंड चर्चेत आहे. नुकतंच पूर्वाने एक वेबसाईटला मुलाखत दिली. त्यावेळी तिने मालिकेच्या सेटवर घडलेल्या किस्स्यांबद्दल खुलासे केले आहेत.

Alia- Ranbir Wedding : रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारीख समोर, नव्या सूनबाईंबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर नीतू कपूर म्हणाल्या…

पूर्वा शिंदे ही गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, टेलिव्हीजन या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. नुकतंच दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारत असली तरी मी वैयक्तिक आयुष्यात फार चांगली आहे. पण अनेकजण मला भेटण्यासाठी नकार देतात. पण एकदा भेटल्यानंतर माझे मालिकेतील खलनायक पात्र आणि माझ्यातील फरक त्यांना कळतो. त्यावेळी त्यांचा हा गैरसमज दूर होतो.”

या मालिकेमध्ये तुझा सर्वात आवडता मित्र कोण आहे, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “माझा आवडता मित्र किंवा मैत्रिण असे कोणीही नाही. माझी सगळ्यांसोबत मैत्री जमते. मात्र सेटवर चित्रा आणि मी खूप मस्ती करतो. पण इतरांशी माझं फार कमी जमतं.”

“एकता कपूरच्या गटात फक्त आवडत्या कलाकारांनाच प्रथम प्राधान्य मिळतं”, प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप

विशेष म्हणजे ‘अंतरा ही मालिकेप्रमाणेच तिच्या आयुष्यात देखील थोडी लाजरी मुलगी आहे.’ यानंतर तिला सेटवर सगळ्यात जास्त मस्ती कोण करते? असा सवाल करण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “या मालिकेच्या सेटवर सगळ्यात जास्त मस्ती मीच करते. इतर सर्वजण फार शांत असतात. त्यामुळे माझं पॅकअप झाल्यानंतर मला सर्वजण सेटवरुन हकलवतात आणि घरी जा असे सातत्याने सांगतात.”

सध्या पूर्वा ही जीव माझा गुंतला या मालिकेत खलनायक भूमिका साकारत आहे. जीव माझा गुंतला या मालिकेत ती मुख्य भूमिकेत असलेल्या अंतराच्या बहिणीचे म्हणजेच श्वेताचे पात्र साकारत आहे. पूर्वा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lagir jhal ji fame actress purva shinde aka jayde talk about serial shooting funny experience nrp

ताज्या बातम्या