छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता केसवानी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. श्वेताने ‘अभिमान’, ‘कहानी घर-घर की’ आणि ‘देश में निकला होगा चांद’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकांमुळे तिला सिनेसृष्टीत खरी ओळख मिळाली. नुकतंच तिचा They Made us नावाचा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट चांगलाच हिट ठरला. नुकतंच जागरण.कॉमला दिलेल्या मुलाखतीत तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल खुलासा केला आहे.

“माझ्यासोबत अनेकदा कास्टिंग काऊचचा प्रकार घडला आहे. त्यामुळेच मी छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. कारण त्यावेळी छोट्या पडद्यावर कोणतेही कास्टिंग काऊचसारखे प्रकार घडले नव्हते. छोट्या पडद्यावर कास्टिंग काऊचप्रमाणे घटना घडलेली नसली तरी गटबाजी नक्कीच होते, याचा अनुभव मला आला”, असे श्वेता केसवानी म्हणाली.

“दिग्दर्शकासोबत तुला एकांतात…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

त्यापुढे ती म्हणाली, “यात एकता कपूरच्या गटाचाही समावेश आहे. त्या गटात फक्त आणि फक्त एखाद्या आवडत्या कलाकारांनाच प्रथम प्राधान्य मिळते, पण मला त्याही गोष्टी पटल्या नाहीत. मला याचा काहीही फरक पडत नाही. कारण मी कधीही एकता कपूरसोबत काम केलेले नाही.”

“पण हॉलिवूडमध्ये तुम्हाला तुमच्या टॅलेंट आणि ऑडिशन्सच्या आधारावर संधी मिळतात. मी आत्तापर्यंत हजारो ऑडिशन्स दिल्या आहेत. त्यानंतर आता कुठेतरी मला काम मिळू लागले आहे आणि अद्याप माझा संघर्ष संपलेला नाही. हॉलिवूडमध्येही काही प्रमाणात गटबाजी असते. त्या ठिकाणी असणाऱ्या मोठमोठ्या कलाकारांचे स्वत:चे वेगळे गट असतात. पण आतापर्यंत मी एकाही गटाचा भाग झालेले नाही”, असेही ती म्हणाली.

Video : “हा काय संतोष जुवेकर हाय…”; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याने उडवली अभिनेत्याची खिल्ली

“सध्या मी हॉलिवूडमध्ये संघर्ष करत आहे. पण मी फार आनंदी आहे. कारण मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळत आहे. त्यासोबत मला कामही करता येत आहे. मला भारतात एका ओटीटी प्लॅटफॉर्म वेब सीरिजसाठी ऑफर मिळाली होती. मात्र मला त्यांना शूटींगसाठी वेळ देणे शक्य नाही. माझे पती आणि माझी मुलगी हे अमेरिकेत आहेत. त्यामुळे त्यांना सोडून इथे राहणे माझ्यासाठी शक्य नाही. त्यामुळे इथे कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मी अमेरिकेतच कामाच्या शोधात आहे”, असेही तिने म्हटले.