Lakshmi Manchu Hints Samantha Ruth Prabhu Struggle after Divorce with Naga Chaitanya : अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या चित्रपटांमुळे, तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिली आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले. समांथाने २०२१ मध्ये नागा चैतन्यबरोबर घटस्फोट घेतला. नागा चैतन्य आणि समांथाच्या चाहत्यांना या बातमीमुळे चांगलाच धक्का बसला होता.

अभिनेत्री लक्ष्मी मांचू अलीकडेच एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. नाव न घेता, तिने घटस्फोटानंतर काम शोधण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका सुपरस्टार अभिनेत्रीचा उल्लेख केला. लक्ष्मी म्हणाली, “अभिनेत्रीला केवळ इंडस्ट्रीमध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आलं नाही, तर ज्या चित्रपटांसाठी तिला आधीच साइन करण्यात आलं होतं, तेही तिच्याकडून काढून घेण्यात आले आहेत.” लक्ष्मी मांचूने कोणाचेही नाव घेतले नाही; परंतु इंडस्ट्रीमध्ये असे मानले जाते की, ती समंथाबद्दल बोलत आहे. समांथाला घटस्फोटानंतर इंडस्ट्रीनं बॉयकॉट केलंय का? अशी चर्चा आहे.

समंथाने २०१७ मध्ये नागार्जुन यांचा मुलगा व सुपरस्टार नागा चैतन्य याच्याशी लग्न केले. या जोडप्याला बरीच लोकप्रियता मिळाली; परंतु २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर समांथाच्या कारकिर्दीत घसरण झाली आहे. तिला काही चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. त्यापैकी बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत नाहीत.

‘ग्रेट आंध्रा’ला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मीने सांगितले की, समाजात पुरुषांपेक्षा महिलांना जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. ती म्हणाली की, लोक नेहमीच महिलांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोट उचलतात; परंतु पुरुषांच्या चुका लवकर विसरल्या जातात.” लक्ष्मी मांचूच्या विधानामुळे पुन्हा एकदा असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, लग्न किंवा घटस्फोटानंतर अभिनेत्रींना कामाचा अभाव का जाणवतो, तर पुरुष कलाकारांच्या कारकिर्दीवर कोणताही परिणाम होत नाही. समंथाची कारकीर्द या वादाचे नवीनतम उदाहरण बनली आहे.

समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यची जोडी इंडस्ट्रीतील चर्चेचा विषय होती. परंतु, २०२१ मध्ये या दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर समांथा चित्रपटात जास्त दिसली नाही. त्याशिवाय तिचे जे चित्रपट आले, तेसुद्धा तितके चालले नाहीत. सध्या समांथा दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करतेय, अशी चर्चा आहे. परंतु, दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपचा जाहीर खुलासा केलेला नाहीये. नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट केले आणि नंतर २०२४ मध्ये तिच्याशी लग्न केले.