इमरान हाश्मीचे चुंबन घेण्याची लाराची इच्छा!

अनेक अभिनेत्रींना त्याच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याची इच्छा असते.

Lara Dutta , Bollywood, Emraan Hashmi , Azhar, Entertainment moveis, loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Lara Dutta : या चित्रपटात लारा दत्ता वकिलाची भूमिका करत असून तिने इमरानसोबतच्या चुंबनदृश्याला होकारही दिला होता.

अभिनेत्री लारा दत्ता हिने बॉलीवूडमधील ‘सिरीयल किसर’ इमरान हाश्मीचे ऑनस्क्रीन चुंबन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉलीवूडमधील कारकीर्दीच्या सुरूवातीपासूनच इमरान हाश्मीची ‘सिरीयल किसर’ म्हणून तयार झालेली प्रतिमा आजही कायम आहे. त्यामुळे अनेक अभिनेत्रींना त्याच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याची इच्छा असते. आता यामध्ये लारा दत्ताचीही भर पडली आहे. आगामी ‘अझर’ या चित्रपटातही इमरान नर्गीस फाखरी आणि प्राची देसाई यांच्याबरोबर इमरानने उत्कट चुंबनदृश्ये दिली आहेत. या चित्रपटात लारा दत्ता वकिलाची भूमिका करत असून तिने इमरानसोबतच्या चुंबनदृश्याला होकारही दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात लारा इमरानसोबत चुंबनदृश्य देण्यासाठी तयार होती. मात्र, कथानकाची तशी गरज नसल्यामुळे लाराची ही इच्छा अपूर्ण राहिली. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित ‘अझर’ १३ मे रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात इमरान हाश्मी अझरउद्दीनच्या मुख्य भूमिकेत, तर प्राची देसाई अझरची बायको नौरीनच्या भूमिकेत दिसेल. नर्गिस फाखरी संगिता बिजलानीची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lara dutta expresses desire to kiss emraan hashmi on screen

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या