भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. त्यात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. लतादीदींचा फोटो शेअर करत “हा एक दुखदं दिवस आहे. भारताच्या गाणं कोकीळा लता मंगेशकरजी आता आपल्यासोबत राहिल्या नाहीत, एका अप्रतिम युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या गाण्यांतून त्या कायम आपल्या सगळ्यांच्या हृदयात जिवंत राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो”, असे कॅप्शन अल्लू अर्जुनने दिले आहे.

sundara manamadhe bharli akshaya naik
“जेवढ्या लोकांनी हिणवलं…”, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने बॉडी शेमिंगबद्दल मांडलं मत; म्हणाली, “जाड असण्याबद्दल…”
What Samantha Said?
‘निरागस पतीला का फसवलंस?’, ट्रोलरच्या प्रश्नावर समांथाचं रोखठोक उत्तर, म्हणाली..
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

आणखी वाचा : “जरा तरी लाज बाळग…”, कारमधला डान्स व्हिडीओ शेअर केल्याने अंकिता लोखंडे झाली ट्रोल

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली.

Lata Mangeshkar : “मी फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो”, पाकिस्तानमध्ये सुनील गावस्कर यांनी घेतला होता अपमानाचा बदला

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.