Loksatta Exclusive Video: …म्हणून प्रवीण तरडेंच्या ऑफिसमध्ये आहे राजामौलींचा भला मोठा फोटो; कारण जाणून वाटेल अभिमान

स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती असणाऱ्या हंबरीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित ‘सरसेनापती हंबरीरराव’ चित्रपट या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

pravin tarde rajamouli
लोकसत्ताच्या 'डिजीटल अड्डा'वर सांगितलं या मागील खास कारण

सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट तुफान कामगिरी करत आहे. असं असतानाच या आठवड्यात म्हणजेच शुक्रवारी दिग्दर्सक प्रवीण तरडेंचा आणखीन एक नवीन चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती असणाऱ्या हंबरीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित ‘सरसेनापती हंबरीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होत आहे. याच चित्रपटानिमित्त प्रवीण तरडे आणि त्यांची टीम लोकसत्ता ऑनलाइच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी झाली होती.

‘डिजिटल अड्डा’वरील चर्चेदरम्यान प्रवीण तरडे यांनी दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक राजामौली हे त्यांचे आदर्श असल्याचं सांगितलं. इतकचं नाही तर त्यांचा एक मोठा फोटो प्रवीण तरडेंनी त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावून घेतल्याचीही माहिती दिली. मात्र हा फोटो लावण्यामागे आणि राजामाऊंचा आदर्श समोर ठेवण्यामागील कारण हे खरोखरच प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं आहे.

राजामौलींबद्दल बोलताना प्रवीण तरडे अगदी उत्साहाने त्यांच्या कार्यालयात लवलेल्या राजामौलींच्या फोटोबद्दल सांगत होते. “मी एकलव्य आहे त्यांचा. माझ्या या जवळच्या मित्रांनाच माहिती आहे. माझ्या ऑफिसमध्ये जर तुम्ही एन्ट्री केली तर तुम्हाला मोठ्या आकाराचा राजामौलींचा मोठा फोटो दिसेल. मागील सात वर्षांपासून तो फोटो आहे. मी रोज ऑफिसमध्ये प्रवेश करताना त्या फोटोकडे असं मिनीटभर बघतो आणि मगच आत जातो,” असं प्रवीण तरडेंनी सांगितलं.

बरं असं करण्यामागील कारणाबद्दलही प्रवीण तरडेंनी भाष्य केलंय. “या माणसाने जशी त्याच्याकडील प्रादेशिक चित्रपटाची दखल जगाला घ्यायला भाग पाडली. तसं माझ्या सिनेमाची दखल जगाने घ्यावी असं वाटतं. असेच सिनेमा आपण निर्माण करत राहणार,” असं तरडे म्हणाले.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’च्या निमित्ताने काही आठवड्यांपुर्वीच तरडे आणि त्यांच्या टीमने राजमौलींची भेट घेतली होती. या भेटीबद्दल बोलताना, “मी त्यांना भेटल्यानंतर भावूक झालो. ते त्यांच्या भाषेत बोलत होते आणि मी मराठीत बोलतो होतो. ते त्यांची भाषा सोडत नाहीत,” असंही तरडे या भेटीची आठवण सांगताना म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta exclusive pravin tarde says i have big photo of south director rajamouli in my office for special reason scsg

Next Story
करण जोहरवर केलेले आरोप खोटे, टी-सीरिजनेच पाकिस्तानी गायकाची केली बोलती बंद
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी