प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ फक्त भारतातच नाही परदेशातही लोकप्रिय आहे. कपिल शर्मा शोच्या आगामी एपिसोडमध्ये ‘द गेम इन अटेंडन्स’चे कलाकार, माधुरी दीक्षित, मानव कौल, संजय कपूर, लखवीर सरन, मुस्कान जाफरी दिसणार आहेत. नुकताच या एपिसोडचा प्रोमो प्रसारित झाला आहे. ज्यात अभिनेत्री माधुरी दीक्षितनं अजब खुलासा केला आहे

‘कपिल शर्मा शो’च्या नव्या प्रोमोमध्ये कपिल शर्मा माधुरीचं कौतुक करताना दिसत आहे. तो माधुरीला म्हणतो, ‘मी कॉलेजमध्ये मुलांकडे पैसे असतील किंवा नसतील पण त्यावेळी त्यांच्याकडे माधुरी दीक्षितचा फोटो मात्र नक्की असायचा. जेव्हा मुलं मुलींना फुलं मारुन त्यांच्याशी फ्लर्ट करतात तेव्हा त्यांना खास आहोत असं वाटतं. त्यांना वाटतं त्या माधुरी दीक्षित आहेत.’

कपिल शर्मानं यावेळी माधुरीला विचारलं, ‘जेव्हा तुझ्याशी कोणी फ्लर्ट करतं तेव्हा कसं वाटतं?’ त्यावर माधुरीनं मजेदार उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘अशावेळी मला फक्त डॉ. श्रीराम नेने यांची आठवण येते.’ माधुरीचं बोलणं ऐकून तिथं बसलेले सर्वाच जोरजोरात हसू लागतात.

माधुरी दीक्षित लवकरच ‘द फेम गेम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून ती डिजिटल डेब्यू करत आहे. ही वेब सीरिज २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. याआधी ती अभिषेक वर्मनच्या ‘कलंक’ चित्रपटात दिसली होती. ज्यात आलिया भट्ट, वरुण धवन आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या.