अभिनेत्री माधुरी दिक्षीतने नुकतंच आपले पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत मालदिवमध्ये एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. आज तिने एक नवा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने आपल्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे.

आज जागतिक आरोग्य दिन. त्यानिमित्त माधुरीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो आणि एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यातल्या एका फोटोत ती मेडिटेशनच्या स्थितीमध्ये बसली आहे. तर तिचा कुत्राही तिच्यासोबत बसलेला दिसत आहे. जिममध्ये व्यायाम करत घाम गाळतानाचा तिचा व्हिडिओही तिने शेअर केला आहे. तर एका फोटोत भाज्या आणि फळांनी भरलेली प्लेट दिसत आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “माईंड, बॉडी, फुड, सोल……आरोग्यदायी जीवनशैलीची प्रतिज्ञा करूयात.” माधुरीच्या फॅन्सनी तिच्या या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या चाहत्यांनी त्यांना हे फोटो खूप आवडल्याचं कमेंट्समधून सांगितलं आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ पाहून कोणालाही कळेल की हेच आहे तिच्या सौदर्यांचं आणि आरोग्याचं रहस्य!

दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. विशिष्ट थीम घेऊन त्याविषय़ी जागरुकता निर्माण करत हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची थीम होती, ‘सर्वांसाठी न्याय्य आणि आरोग्यपूर्ण जगाची उभारणी.’

वर सांगितल्याप्रमाणे माधुरीने नुकतीच आपली सुट्टी आपले पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत मालदिवमध्ये साजरी केली. या सुट्टीचे फोटो ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेळोवेळी शेअर करत होती. “डेट नाईट रेडी” अशा कॅप्शनसह काल तिने पोस्ट केलेला फोटो पाहून तर तिचे चाहते अक्षरशः तिच्या प्रेमातच पडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही ५३ वर्षीय अभिनेत्री सध्या ‘डान्स दिवाने’ या रिऍलिटी शोचं परिक्षण करत आहे. यापूर्वी ती करण जोहर निर्मित ‘कलंक’ या चित्रपटात दिसली होती.