शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावर राजकीय नेत्यांसोबत बरेच सेलिब्रेटी देखील व्यक्त होताना दिसत आहेत. मिर्झापूर फेम अभिनेता दिव्येंदु शर्मानं देखील महाराष्ट्रील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. दिव्येंदुनं कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव न घेता या राजकीय परिस्थितीवर निशाणा साधला आहे.

दिव्येंदुने आपल्या ट्वीटमध्ये मजेदार अंदाजात लिहिलं, ‘सेल…सेल…सेल…एमएलए ले लो… या कथित नेत्यांसाठी राजकारण हा एक व्यवसाय झाला आहे.’ दिव्येंदुचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालेलं पाहायला मिळत आहे. १५ हजार पेक्षा जास्त लोकांनी हे ट्वीट लाइक केलं आहे तर २ हजार पेक्षाही जास्त लोकांनी ते रिट्विट केलं आहे. याशिवाय अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

दिव्येंदुच्या या ट्वीटवर सोशल मीडिया युजर धम्माल प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरनं यावर कमेंट करताना लिहिलं, ‘अगदीच बरोबर आहे सर, मी याच्याशी सहमत आहे.’ तर दुसऱ्या एका युजरनं, ‘सत्य हे कंटाळेल पण कधीच हार मानणार नाही.’ अशी कमेंट केली आहे. आणखी एक युजरनं, ‘जनता टॅक्स देत राहिली आणि नेता मजा करत राहिले.’ अशाप्रकारे अनेक युजर्सनी दिव्येंदुच्या ट्वीटवर कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- नागा चैतन्याच्या अफेअर्सच्या चर्चांवर पूर्वश्रमीची पत्नी सामंथाची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दिव्येंदुच्या कामाबद्दल बोलायचं तर तो अलिकडेच ‘साल्ट सिटी’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. ही वेब सीरिज १६ जूनला प्रदर्शित झाली आहे. ही एक कौटुंबिक वेब सीरिज आहे आणि वेब सीरिजमध्ये दिव्येंदुचा खूपच वेगळा अवतार पाहायला मिळाला आहे. या वेब सीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लाटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली आहे. तर तुफान गाजलेल्या ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये त्याने मुन्ना भैय्याची भूमिका साकारली होती.