‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमातील विनोदवीर अभिनेता गौरव मोरे हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. मराठी नाटक, चित्रपट यासारख्या अनेक ठिकाणी अभिनयाची छाप उमटवणाऱ्या गौरव मोरेला भिमरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

नुकतंच भिमरत्न पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात गौरव मोरेला भिमरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने या पुरस्कार सोहळ्यातील एक फोटोही शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना तो भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गौरव मोरेची फेसबुक पोस्ट

“भिमरत्न पुरस्कार सोहळा २०२२

खरच मी हया पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणाऱ्यांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोट्ठा मान आपण दिलात. खुप आभारी आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याहस्ते हा पुरस्कार देन्यात आला. सोबत महाराष्टाचे ख्यातनाम गायक आनंद शिंदेसाहेब,मिलिंद शिंदेसाहेब आणि मधुर शिंदे उपस्थित होते.

धर्मात्मा फाउंडेशन चे खुप खुप आभार मानतो. सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. पंकज चंदनशिवे, मिलिंद जगताप आणि सचिन घूमरे दादा धन्यवाद.” असे गौरव मोरे म्हणाला.

गौरव मोरेच्या या पोस्टला अनेकांनी लाइक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक जण कमेंट करताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरवने महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून अभिनय करायला सुरुवात केली आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून गौरवने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गौरव घराघरात पोहोचला. गौरवने संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपट देखील काम केलं आहे.