मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रताप ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत पृथ्वीक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. त्याने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पृथ्वीकने त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि चित्रपटसृष्टीतील स्ट्रगलबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “५७ व्या वर्षी चित्रपटात एवढे स्टंट कसे करतोस?” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत शाहरुख खान म्हणाला, “भाई मी खूप पेनकिलर…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेल्या पृथ्वीकला इथवर पोहोचण्यासाठी अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या संघर्षाविषयी भाष्य केले आहे. यावर बोलताना अभिनेता म्हणाला, “आयुष्यात अजूनही मी संघर्षच करतोय…आपण सगळेच मरेपर्यंत संघर्ष करणार आहोत. एक विशिष्ट जागा गाठण्यासाठी आपण कोणीच देव नाहीये. आमचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी नेहमी म्हणतात, ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय कोणालाच चुकलेली नाही. ज्याची उत्पत्ती झाली तो स्थित्य होणार आणि तो लयीला सुद्दा जाणार… उत्पत्ती, स्थिती आणि लयीचा प्रवास करताना प्रत्येक वळणावर स्ट्रगल आहे.’ हा स्ट्रगल कधीच कोणाला चुकला नाही. स्थित्य माणसाला सुद्धा संघर्ष आहेच, माझ्या आयुष्यात आता सुद्धा संघर्ष आहेच पण, आता त्याचे प्रमाण पूर्वी पेक्षा कमी झाले आहे.”

हेही वाचा : पत्नी कतरिना कैफच्या ‘या’ चित्रपटासाठी विकी कौशलने दिली होती ऑडिशन, पण निर्मात्यांनी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पृथ्वीक पुढे म्हणाला, “ऑडिशनसाठी सतत धावपळ करायचो तेव्हा या संघर्षाचा मला सर्वात जास्त त्रास झाला. एकेकाळी खिशात पैसे नसायचे, फक्त ३० रुपये प्रवासासाठी ठेवायचो. एकदा घरून आणलेला डबा संपला की, नंतर काय खायचं असा प्रश्न निर्माण व्हायचा. तेव्हा मी पार्लेजी बिस्किटं खायचो. माझ्याबरोबर तेव्हा सागर जाधव, रोनक शिंदे, प्रशांत केणी, रोहित माने, चेतन गुरव, वनिता खरात, स्नेहन शिदम हे लोक असायचे. तो स्ट्रगल आम्ही एकत्र केला…तेव्हाचे दिवस फार त्रासदायक होते. कोणाचेच पोट नाही भरायचे, तरीही आम्ही प्रत्येकजण एकमेकांना मदत करायचो. आम्ही तेव्हा एकत्र होतो आताही एकत्र आहोत. अलीकडे परिस्थिती तुलनेने खूप सुधारलीये म्हणून आता जेव्हा कधी भेटतो तेव्हा एकत्र हॉटेलमध्ये जातो.”