रंग, रुप किंवा देहरचनेवर तुमचं सौंदर्य किती चांगलं आहे हे ठरत नाही हे अभिनेत्री वनिता खरातकडे पाहिलं की लक्षात येतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे वनिता नावारुपाला आली. पण या कार्यक्रमाशिवाय तिने मराठीसह हिंदी चित्रपटामध्येही काम केलं आहे. शाहीद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य नेमकं कसं आहे? हे जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. असाच वनिताचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. परदेशातील प्रेक्षकही या कार्यक्रमावर प्रचंड प्रेम करतात. म्हणूनच सोनी मराठी वाहिनीने एक नवा प्रयोग सुरु केला. ‘गॉसिप आणि बरंच काही’ हा कार्यक्रम या वाहिनीने सुरु केला. दर आठवड्यामध्ये रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. यामध्ये कॅमेऱ्यामागची धमाल-मस्ती आणि किस्से याबाबत कलाकार बोलताना दिसतात.

पाहा व्हिडीओ

वनिताने या कार्यक्रमामध्येच आपल्या खासगी आयुष्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. ते सगळीकडेच चर्चेचा विषय ठरलं होतं. शिवाली परबने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे वनिताचा हा व्हिडीओ शेअर केला होता. “शाळेत असताना क्रशला काय गिफ्ट दिलं?” असा प्रश्न शिवाली वनिताला या व्हिडीओमध्ये विचारताना दिसत आहे. यावर उत्तर देत ती म्हणते, “याचं उत्तर दिलं असतं पण ते बॉयफ्रेंड आता राहिले नाहीत.”

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बिनधास्त मुलगी वनिता खरातचे आजवरचे सर्वात बोल्ड लूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणजेच इतर सामान्य मुलींसारखंच वनितालाही शाळेत पहिलं प्रेम मिळालं होतं असं म्हणायला हरकत नाही. वनिताने तिच्या दमदार अभिनयाने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ती करत असलेलं काम तर कौतुकास्पद आहे.