scorecardresearch

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमची धमाल ट्रीप, सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल

सध्या या मालिकेची टीम लोणावळ्याच्या रिसॉर्टमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

Maharashtrachi Hasyajatra trip

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्राचे नवे पर्व लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. येत्या ५ जुलैपासून या महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या नव्या पर्वाला शूटींगला सुरुवात होणार आहे. सध्या या मालिकेची टीम लोणावळ्याच्या रिसॉर्टमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता समीर चौगुले हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. ते नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते. समीर चौगुले याने नुकतंच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत मालिकेची संपूर्ण टीम दिसत आहे.

“जर अनिरुद्ध सुधारलेला असेल तर…”, ‘आई कुठे काय करते’मधील मिलिंद गवळींची खास पोस्ट

निर्मात्यांचे, अमित फाळके यांचे आणि सोनी मराठी वाहिनीचे खूप खूप आभार. लोणावळा….कार्यशाळा, चर्चा, पार्टी, नृत्य, कराओके, भेटवस्तू, भोजन आणि बरेच काही…, असे समीर चौगुलेने म्हटले. तर नम्रता आवटे-संभेराव हिने याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती पावसात धमाल करताना दिसत आहे. यात हास्यजत्रेच्या अभिनेत्री मिळून ‘नभ उतरू आलं’ हे गाणे गुणगुणत असल्याचे दिसत आहे. तसेच प्राजक्ता माळीनेही तिचे काही फोटोही शेअर केले आहे.

राजपाल यादववर २० लाखांच्या फसवणुकीचा आरोप, १५ दिवसात पोलिसात हजर राहण्याचे आदेश

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम २०१८ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. लवकरच याचे नवे पर्व पाहायला मिळणार आहे. यात नक्की काय नवीन असणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच हे गुपित उलगडणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra team enjoying picnic at lonavala share photo viral nrp

ताज्या बातम्या