दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूला ओळखले जाते. महेश बाबूने अभिनयासोबत आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेला हा अभिनेता अभिनेत्री नम्रता शिरोडकरला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर हे जोडपे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.

महेशबाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. काही दिवसांपूर्वी नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ask me anything द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतही महेश बाबू यांच्याबद्दलही अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची तिनेही उत्तरे दिली.

यादरम्यान एका चाहत्याने नम्रताला महेश बाबूच्या सोशल मीडियावर प्रश्न विचारला होता. यावेळी एका चाहत्याने नम्रताला प्रश्न विचारला, ‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ त्यावर तिने मजेशीर उत्तर दिले आणि सोबतच तिने तिच्या मनातील इच्छाही बोलून दाखवली. चाहत्याच्या या प्रश्नावार उत्तर देताना ती म्हणाली, ‘माझीसुद्धा फार इच्छा आहे. पण माझ्या दोन्हीही मुलांना मराठी येते. त्यासोबत त्यांना इंग्रजी आणि तेलुगू भाषाही बोलता येते’, असे तिने सांगितले.

“माझ्या ब्रा चे माप…”, अभिनेत्री श्वेता तिवारीने ब्रा साईज आणि देवाबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर महेश-नम्रताने १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. मात्र महेश बाबू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाला. महेश आणि नम्रताला दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत.