बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न बंधनात अडकले. आलियाने नुकतीच कॉफी विथ करणच्या ७ व्या पर्वात हजेरी लावली होती. यावेळी आलियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सामान्य लोकांच्या लग्नात जसे नातेवाईक नाराज होतात पण आलियाच्या लग्नात तर चक्क तिचे वडील महेश भट्ट नाराज झाले होते. पण या विषयी आलियाला माहित नव्हते तर करणने शोमध्ये याचा खुलासा केला तेव्हा आलियाला धक्काच बसला.

आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ

शोमध्ये आलियाच्या वैवाहिक आयुष्यावर बरीच चर्चा झाली होती. कपूर कुटुंबाची सून झाल्यानंतर आलियाच्या आयुष्यात काय बदल झाला, रणबीरने कसं तिला प्रपोज केलं, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आलियाने दिली. लग्नाच्या चर्चेदरम्यान करणने एक मजेदार खुलासा केला की आलियाला वधूच्या गेटअपमध्ये पाहून लग्नात लोक भावूक झाले होते, विशेषतः मुलीच्या बाजूने असणारे भावूक झाले, पण भट्ट साहेब म्हणाले, ‘लग्नाच्या दिवशी मुलीच्या बाजूने असणाऱ्यांचे चेहरा वाईट का दिसतात.’ हे ऐकल्यावर पूजा भट्ट म्हणाली, ‘बाबा असं नाही, प्रत्येकव्यक्ती भावूक झाला आहे.’ जेव्हा आलियाने हे ऐकलं तेव्हा ती वडिलांना, म्हणाली ‘बाबा हे किती वाईट आहे, तुम्ही असं म्हणालात?’

आणखी वाचा : 50 Shades Of Gray: “मला बेडवर फेकले अन्…”, इंटिमेट सीन शूटचा डकोटाने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

‘कॉफी विथ करण’च्या ७ व्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्टने हजेरी लावली होती. शोची सुरुवात धमाकेदार झाली आहे. हा शो काल म्हणजेच ७ जुलै पासून सुरु झाला आहे.