छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील शनायाची भूमिका साकारणाऱअया अभिनेत्री रसिका सुनीलचे तर लाखो चाहते आहेत. रसिकाने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी लग्न गाठ बांधली आहे. रसिका आणि आदित्य बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. रसिकाने नुकताच त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे.

रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या दोघांनी गोव्यात लग्न केले आहे. सप्तपदी घेतानाचा हा फोटो शेअर करत ‘१८ ऑक्टोबर २०२१, बीचवर रस्की-आदिचं लग्न’, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. त्या दोघांनी १८ ऑक्टोबर रोजी लग्न केले आणि आज ३० ऑक्टोबर रोजी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या लग्नात फक्त जवळच्या लोक होते.

आणखी वाचा : काजोलचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी केली उर्फी जावेदशी तुलना म्हणाले…

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’ या मालिकेचे खरे चाहते असाल तर फोटोमधील चंपकलालला ओळखून दाखवाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रसिकाने २ वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडून होती. त्यानंतर रसिका लॉस एंजिलिसला पुढंच शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिथे तिची ओळख आदित्यशी झाली. १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने तिच्या रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले होते.