बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोराच्या गाडीला पनवेल जवळ अपघात झाला. मलायकाच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला आणि राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून जात असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या तीन गाड्यांना मलायकाच्या गाडीने धडक दिली. या घटनेत मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही माहिती महाराष्ट्र निर्माण सेनेच्या जनहित संघटनेचे  ज्यांनी सरचिटणीस जयराज लांडगे यांनी दिली आहे.

जयराज लांडगे म्हणाले, “राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून मुंबईकडे आम्ही निघालो असताना पनवेलनजीक मलाइका अरोरा यांच्या गाडी वरील ड्रायव्हरचा ताबा सुटून मनसेच्या तीन गाड्यांना मलायका यांच्या गाडीने धडक दिली. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात आपण दाखल केले आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल करून मनसेचे नेते लांडगे आणि त्यांचे सहकारी पुढे राज साहेब ठाकरे यांच्या सभेला मार्गस्थ झाले आहेत, अशी माहिती लांडगे यांनी दिली आहे.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

आणखी वाचा : “…असले घाण आरोप कोणी लावू नका”, विशाखा सुभेदारने घेतला ‘हास्य जत्रा’ सोडण्याचा निर्णय

आणखी वाचा : धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

आणखी वाचा : Hindu New Year 2022 Horoscope : पुढचे १ वर्ष या राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

जयराज लांडगे यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित संघटनेचे सरचिटणीस जयराज लांडगे यांनी प्रसंगावधान राखून मलायकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावरील उपचाराची सोय करुनच ते मुंबईकडे रवाना झाले. लांडगे यांच्या या प्रसंगावधानाने सर्वत्र कौतुक होत आहे