मलायका अरोरा तिच्या हटके स्टाइल आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते. अभिनय आणि डान्ससोबतच मलायका तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. जीम असो, मॉर्निंग वॉक किंवा मग रेड कार्पेट मलायका तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे अनेकदा चर्चेत आलीय.
असं असलं तरी ग्लॅमरस कपड्यांची निवड केल्याने मलायकला देखील अनेकदा काही विचित्र गोष्टींचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळे मलायकाला ट्रोल देखील व्हावं लागलं होतं. २०२० सालातील मिस दिवा युनिव्हर्स ग्रँड फिनालेच्या रेड कार्पेटवर मलायकाला तिने परिधान केलेल्या गाउनमुळे लाजीरवाण्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं होतं. यावेळी तिच्या सोबत असं काही झालं की ज्यामुळे अनेकांनी मलायकाला तिच्या फॅशनवरून ट्रोल केलं.
“अरमान मला फक्त घटस्फोटीत म्हणाला नव्हता तर त्याने…”; काम्या पंजाबीचं ट्वीट चर्चेत
या सोहळ्याला मलायकाने पिवळ्या रंगाचा वन शोल्डर गाऊन परिधान केला होता. या पायघोळ गाऊनला अनेक लेयर्स होते ज्यात पिवळ्या रंगाचे वेगवेगळे शेडस् पाहायला मिळत होते. मात्र मलयाका जेव्हा फोटोग्राफर्सना पोज देण्यासाठी आली तेव्हा स्लिट असलेल्या या गाऊनमुळे मलायकाला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला ज्यामुळे ती काहीशी अवघडलेली दिसली. मात्र काही सेकंदातच मलायकाने ड्रेस सावरला आणि ती पोज देण्यासाठी तयार झाली.
KBC: “ही तर शिवी आहे ना”, स्पर्धकाची भाषा ऐकून बिग बींना बसला धक्का
मलायकाचे या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. ‘ सावरता येत नाही तर असे कपडे कशाला घालायचे’ अशा आशयाच्या कमेंट अनेक नेटकऱ्यांनी केल्या होत्या.
ट्रोल होण्याची मलायकाची ही तशी पहिली वेळ नव्हे. काही दिवसांपूर्वी मलायकाला योगा सेशनला जात असताना स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी मलायकाला तिच्या चालण्यावरून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. मलायका बदकासारखी चालते असं नेटकरी म्हणाले होते.