अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सातत्यानं त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. दोघंही नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा व्हायरलही होतात. व्हॅलेंटाइन डेला मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर अर्जुन कपूरसोबतचा फोटो शेअर केला होता. ज्याची बरीच चर्चा झाली होती. पण आता मलायका पुन्हा एकदा एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
मलायकाची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. ज्यात तिनं अर्जुनसोबत केलेल्या एका गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलं आहे. मलायकानं व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिनं अर्जुनसोबतचा फोटो पोस्ट केला होता. पण आता ही पोस्ट केल्याचा तिला पश्चाताप होत आहे.
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं मलायकानं अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अर्जुन कपूर मलायकाच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. त्यांच्या या फोटोची जोरदार चर्चा होती. मात्र आता या फोटोमागची कहाणी समोर आली आहे. अर्जुन कपूरनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘कसं मी तुला हा फोटो पाठवला आणि तू तो माझ्या अगोदर पोस्ट केलास.’ अर्जुनची इन्स्टाग्राम स्टोरी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याचा पश्चाताप होत असल्याचं मलायकानं म्हटलं आहे. यासोबतच तिनं हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

मलायका आणि अर्जुन गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांना बऱ्याच वेळा त्यांच्या नात्यामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. पण ते दोघेही याकडे फारसे लक्ष देत नाहीत. तर मलायकाने २०१७ मध्ये अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिला. अरबाज आणि मलायकाला एक मुलगा असून अरहान खान असे त्याचे नाव आहे.